Mumbai News: मुंबईत कबुतरांना खायला दाणे टाकल्याच्या आरोपाखाली एका व्यावसायिकाला दंड ठोठावल्याची बातमी समोर आली आहे. वांद्र्यातील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने 52 वर्षीय नितीन शेठ नावाच्या एका व्यावसायिकाला सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दिल्याबद्दल दोषी ठरवलं. या प्रकरणासंबंधी न्यायालयाने म्हटलं की, हे कृत्य सार्वजनिक स्वास्थ्यासाठी धोकादायक असून सरकारी आदेशांचं उल्लंघन करणारं आहे. त्यावरून त्यांना 3000 रुपये आणि 2000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
1 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल
1 ऑगस्ट रोजी या प्रकरणासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नितिन शेठ एलजे रोडवरील हिंदूजा रुग्णालयाजवळ असलेल्या कबुतरखान्यातील कबुतरांना यांना दाणे टाकताना पाहिलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या कृत्यामुळे माणसांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो आणि यामुळे आजार देखील पसरू शकतात. त्यानंतर, पोलिसांनी एका महिन्याच्या आत शेठविरुद्ध चार्जशीट दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, शेठ यांनी त्यांच्यावर लावलेले आरोप मान्य केले.
हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत HR पदासाठी भरती! महिन्याला 1.60 लाख पगार अन्...
तसेच, नितिन शेठ यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला की त्यांच्या गुन्ह्याची कबुली ऐच्छिक असल्याने शिक्षेत सूट देण्यात यावी. कोर्टाने त्यांचा अर्ज स्विकारून म्हटलं की, "गुन्ह्याचं स्वरूप लक्षात घेता, यासाठी आर्थिक दंड पुरेसा आहे आणि त्यानुसार दंड आकारण्यात आला."
हे ही वाचा: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरला, ठाकरे बंधूंमधील दादर-माहिमचा तिढा सुटला
न्यायलयाने केलं स्पष्ट
अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही.यू. मिसाळ यांनी 22 डिसेंबर रोजी नितीन शेठ यांना विविध कलमांखाली दोषी ठरवलं. त्यात असं म्हटलं होतं की त्यांच्या कृतींमुळे मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षितता धोक्यात आली आणि सरकारी आदेशांचे उल्लंघन झालं आहे. त्यामुळे हा एक दंडनीय गुन्हा आहे. न्यायलयाने पुढे म्हटलं की, "तुमचं हे कृत्य बेकायदेशीर आणि निष्काळजीपणाने झालं असून यामुळे जीवघेणा आजार पसरू शकतो, हे त्यावेळी तुम्ही जाणून घेणं महत्त्वाचं होतं." जुलै महिन्यात हायकोर्टाने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला दाणे टाकल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
ADVERTISEMENT











