Govt Job: भारत सरकारच्या 'या' कंपनीत HR पदासाठी भरती! महिन्याला 1.60 लाख पगार अन्...

BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या भारत सरकारच्या मल्टी टेक्नॉलॉदी कंपनीत एचआर (HR) प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या कंपनीत HR पदासाठी भरती!

भारत सरकारच्या कंपनीत HR पदासाठी भरती!

मुंबई तक

• 02:15 PM • 26 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारत सरकारच्या कंपनीत HR पदासाठी भरती!

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: भारत सरकारच्या कंपनीमध्ये उमेदवारांसाठी HR पदावर नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. BEML (भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड) या भारत सरकारच्या मल्टी टेक्नॉलॉदी कंपनीत एचआर (HR) प्रोफेशनल पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येत असून यामध्ये एचआर ऑफिसर आणि एचआर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 7 जानेवारी 2026 पर्यंत  bemlindia.in या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

वयोमर्यादा 

ऑफिसर-एचआर पदासाठी 29 वर्षे तसेच, असिस्टंट मॅनेजर-एचआर पदासाठी 30 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

शैक्षणिक पात्रता 

ऑफिसर एचआर पदांसाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची डिग्री असण्यासोबतच, 2 वर्षांचा फूल टाइम एमबीए (एचआर/ आईआर)/ एमएसडब्ल्यू किंवा एमए सोशल वर्क (एचआर/ आईआर)/ पोस्ट ग्रेजुएट डिग्री/ पर्सनल मॅनेजमेन्ट अँड इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे किंवा कोणत्याही संस्थेतून फूल टाइम 'एचआर/ आईआर'चा कोर्स करणं गरजेचं आहे. 

याव्यतिरिक्त, ऑफिसर एचआर पोस्टसाठी उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव आणि असिस्टंट मॅनेजर एचआर पदासाठी 4 वर्षांच्या कार्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

पगार: पदानुसार, दरमहा 40,000 ते 1,60,000 रुपये 

हे ही वाचा: क्लबमध्ये काम करणाऱ्या महिलेवर जीव जडला अन् विवाहित असून लग्नाची मागणी, पण शेवटी नको ते घडलं अन्...

कसा कराल अर्ज?

1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी bemlindia.in या BEML च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.  
2. त्यानंतर, होमपेजवरील करिअर सेक्शमध्ये जा. 
3. आता, 'Current Recruitment'मध्ये 'Recruitment Of Executive For Human Resource'च्या समोरील 'Apply Online' लिंकवर क्लिक करा. 
4. नंतर, अॅप्लिकेशन पोर्टल उघडल्यानंतर सर्वप्रथम New Registration वर क्लिक करा. 
5. यामध्ये सर्व आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. 
6. आता, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करा. 
7. फॉर्म ओपन झाल्यानंतर मागितलेले माहिती काळजीपूर्व भरा. 
8. तसेच, डॉक्यूमेंट अपलोडच्या सेक्शनमध्ये जाऊन पासपोर्ट साइज फोटो आणि सही अपलोड करा. 
9. शेवटी, प्रवर्गानुसार अर्जाचं शुल्क भरून फॉर्मची फायनल प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा. 

सामान्य (General)/ ईडब्ल्यूएस (EWS)/ ओबीसी (OBC)  उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावं लागेल. तसेच, एससी (SC)/ एसटी (ST)/ पीडब्ल्यूडी (PwD) उमेदवारांना कोणत्याच प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. 

    follow whatsapp