Railway Group D Recruitment 2025: रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) कडून लेव्हल 1 ग्रुप D च्या तब्बल 22,000 पदांसाठी भरतीचं शॉर्ट नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीसाठी www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात. 21 जानेवारी 2026 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
ADVERTISEMENT
काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
'ग्रुप डी'च्या या भरतीमध्ये सर्वाधिक रिक्त जागा या 'ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV' पदांच्या आहेत. या पोस्टसाठी एकूण 11,000 रिक्त पदे अप्रूव्ह केली गेली आहेत. तसेच, पॉइंट्समॅन, असिस्टंट पदांसाठीच्या सुद्धा रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीच्या शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
रेल्वे 'ग्रुप डी'च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, 10 वी उत्तीर्ण असण्यासोबतच आयटीआय कोर्स झालेले उमेदवार सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकतात. संबंधित भरतीचं विस्तृत नोटिफिकेशन अद्याप जाहीर झालं नसून ते लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केलं जाईल.
हे ही वाचा: लग्न ठरलं पण, त्यानंतर असं काय घडलं की तरुणाने त्याच्या होणाऱ्या बायकोलाच संपवलं? नेमकं प्रकरण काय?
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम rrbapply.gov.in या RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. त्यानंतर, संबंधित भरतीसंदर्भात Various Posts in Level 1 of 7th CPC Pay Matrix या लिंकवर क्लिक करा.
3. आता, New Registration Link वर बेसिक डिटेल्स भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
4. रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करा.
5. अर्ज करताना वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरून घ्या.
6. माहिती भरल्यानंतर, फोटो आणि सही अपलोड करून अर्जाचं शुल्क सबमिट करा.
7. आता अर्जाची फायनल प्रिंटआउट काढून भविष्यासाठी ती सुरक्षितरित्या ठेवा.
हे ही वाचा: नंदुरबार: आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून 8 वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल...
अर्जाचं शुल्क
अर्ज करण्यासाठी सामान्य (General)/ ओबीसी (OBC)/ ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. एससी (SC)/ एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिला तसेच ट्रान्सजेंडर उमेदवारांना 250 रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल.
ADVERTISEMENT











