Nanded crime : प्रेम प्रकरणातून खून झालेल्या सक्षम ताटे यांच्या आई व प्रेयसीने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यासमोर आई संगीता ताटे आणि प्रेयसी आचल मामीडवर यांनी अंगावर ज्वलनशिप पदार्थ ओतले. आचल मामीडवार हिच्या आरोपांनुसार दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची मागणी देखील होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नंदुरबार: आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून 8 वीच्या विद्यार्थीनीवर बलात्कार! पोलिसांकडून गुन्हा दाखल...
नांदेडच्या प्रेम प्रकरणात प्रेयसी आणि आईचा आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेडच्या प्रेम प्रकरणातून खून झालेल्या सक्षम ताटेच्या आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न होता. नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यासमोर आई संगीता ताटे व प्रियशी आचल मामीडवर यांनी अंगावर ज्वलनशिप पदार्थ घेऊन केला आत्मदहनाचा प्रयत्न .आचल मामीडवार हिच्या आरोपांनुसार दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी .पोलिसांनी आरोपीला चिथावणी दिल्याने सक्षमचा खून झाल्याचा आचल मामीडवार हिचा आहे आरोप.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय समोर पोलिसांशी झटापटीत.
सक्षम ताटे हत्या प्रकरण काय?
राज्यभर गाजलेल्या सक्षम ताटे खून प्रकरणात आज त्याची प्रेयसी आचल मामीडवार आणि आणि सक्षमच्या आईने , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवल्याने अनर्थ टळला. यावेळी आचल मामीडवार आणि उपस्थित सक्षम ताटेच्या कुटुंबा सोबत पोलिसांचा वाद , आणि धक्काबुक्की झाली. 27 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील जुनागंज भागात सक्षम ताटे युवकाची हत्या करण्यात आली होती. आंतरजातीय प्रेम प्रकरणातून आचल मामीडवार तिच्या वडिलांनी आणि भावांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सक्षमची हत्या केली होती. सर्व आरोपी अटक आहेत, मात्र घटनेच्या दिवशी इतवारा पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी माही दासरवाड, धीरज कोमूलवाड यांनी आचलच्या अल्पवयीन भावाला सक्षमची हत्या करण्यासाठी परावृत्त केले.
हे ही वाचा : रत्नागिरीत देवदर्शनाला जाताना भीषण अपघात, महिला खाली कोसळली अन् तोंडावरून गेलं गाडीचं चाक
सक्षम तुझ्या बहिणीला रोज घेऊन फिरतो आधी त्याला मार आणि नंतर पोलीस स्टेशनला ये असं ते पोलीस कर्मचारी म्हणाले असा आचलचा आरोप आहे. या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आँचल मामीडवार आणि सक्षम ताटे याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली होती. आत्मज्ञानाचा इशारा देखील दिला होता. मग आजपर्यंत कारवाई न झाल्याने आज आँचल मामीलवार आणि आणि सक्षम ताटे त्याच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल. जर कारवाई केली नाही तर आम्ही आमचे जीवन संपवू असा इशारा आचल मामीडवार आणि सक्षम ताटेच्या आईने दिला.
ADVERTISEMENT











