Mumbai News: भारताच्या बहुप्रतिक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकांच्या बांधकामाच्या काळात वायू प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर बीएमसी (BMC) कडून ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेने त्वरीत स्थानकांचं काम थांबवण्याची नोटिस बजावली. त्यानंतर, आता मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
धूळ नियंत्रण उपायांचे पालन न केल्याने कारवाई
बीकेसी परिसरातील या बांधकामाच्या कामामुळे धूळ आणि प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, महापालिकेच्या तपासादरम्यान नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालं. पाणी शिंपडणे आणि पर्यावरणीय नियमांसारख्या आवश्यक धूळ नियंत्रण उपायांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. संस्थेला तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महानगरपालिकेने संबंधित एजन्सीला तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या नियमांचं पालन झालं नाही तर कठोरातली कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं.
हे ही वाचा: पुण्यातील शाळकरी मुलीचा धक्कादायक प्रताप, शिक्षिकेलाच 'आय लव्ह यू'चे मॅसेजेस अन् हातावर नाव कोरून आत्महत्येची धमकी...
मुंबई उच्च न्यायालयाने केलं स्पष्ट...
मुंबईत वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई हायकोर्ट लक्ष ठेवून आहे. या प्रकरणासंदर्भात, मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर म्हणाले की, "महानगरपालिका आयुक्त आणि एमपीसीबीचे सदस्य सचिव यांनी संबंधित एमसीजीएम आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचे वैयक्तिकरित्या स्पष्टीकरण द्यावे, असं आमचं प्राथमिक मत आहे." यावर, खंडपीठाने स्पष्ट केलं की ज्या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं जात नाही अशा ठिकाणी काम थांबवण्याच्या सूचना जारी केल्या पाहिजेत.
हे ही वाचा: Govt Job: रेल्वेमध्ये तब्बल 22,000 रिक्त जागांसाठी भरती! 10 पास उमेदवारांनी करा अप्लाय...
दक्षिण मुंबईच्या फोर्ट, कफ परेड आणि कुलाबा परिसरात चार बांधकाम आणि पुनर्विकास स्थळांवर बीएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्याचं पॅनेलला आढळून आलं. चार पैकी तीन स्थळे बीएमसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेल्या मूलभूत प्रदूषण नियंत्रण आणि सुरक्षा उपायांचे पालन करत नसल्याचं अहवालात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT











