Mumbai Crime : मुंबईतील गोवंडीत बिर्याणीवरून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीनेच आपल्याच पत्नीला संपवलं आहे. या घटनेनं पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे काम केलं आहे. पत्नीने जेवणासाठी बिर्याणीचा बेत केला होता, पण बिर्याणी खारट झाल्याच्याच कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांनी पैसा जरा जपूनच वापरा, काही राशीतील लोकांच्या नोकरीत बदल होणार?
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत होते. या धक्कादायक घटनेनं मुंबईतील गोवंडीतील शिवाजीनगर हादरून गेलं होतं. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील मृत तरुणीचे नाव नाजिया परवीन (वय 23) असे आहे.
बिर्याणीवरून किरकोळ वाद
दोन वर्षांपूर्वी तिचा विवाह मंजर हुसैन नावाच्या तरुणाशी झाला होता. हे दाम्पत्य गोवंडीतील बैगनवाडी परिसरात भाडेतत्वावर राहत होते. सुरुवातीला त्यांचा संसार अगदी सुरळीत सुरु होता. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्यात बिर्याणीवरून किरकोळ वाद झाला होता, याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला होता.
पतीने आपल्या पत्नीचे डोके एका भींतीवर आदळले अन्...
19 डिसेंबर रोजीच्या संध्याकाळच्या सुमारास पत्नी नाजियाने घरात बिर्याणी बनवली होती. मात्र, बिर्याणी खारट झाली होती आणि नंतर मंजर हुसैन संतापला. याच कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. रागाच्या भरात मंजरने नाजियाला बेदम मारहाण करण्यात आली होती. नंतर पतीने आपल्या पत्नीचे डोके एका भींतीवर आदळले आणि ती गंभीर जखमी झाली होती.
हे ही वाचा : मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर
नंतर पीडित नाजियाला तात्काळपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, नंतर उपचारादरम्यान, तिचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर आरोपी पतीने सुरुवातीला काही न पटणारी कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर तपासादरम्यान, खरं सत्य उलगडलं. अशातच आता शिवाजीनगर पोलिसांनी मंजर हुसैनला अटक केली आहे. तसेच पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ADVERTISEMENT











