Hutatma Series : राज्यातील महापालिका निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेली महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचं नाव समोर येतं. याच महापालिकेकडे सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून 'हुतात्मा' नावाची सिरीज 2019 मध्ये झी 5 अॅपवर प्रसारित करण्यात आली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकूण 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. हेच या सिरीजमधून दाखवण्यात आले होते. पण, आता हिच सिरीज झी 5 अॅपवरून हटवण्यात आली आहे. याबाबत आता मनसे चित्रपट कर्मचारी सेनाध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'x' वर ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबई: बिर्याणीमुळे संसारात मिठाचा खडा, नवऱ्याने बायकोला भिंतीवर आपटत संपवलं
अमेय खोपकर यांचं ट्विट जसंच्या तसं...
'2019 च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळी बाबत कठोर भाष्य करणारी एक सिरीज झी 5 वर आली होती. नाव “हुतात्मा” या सिरीज मधील काही प्रसंग मराठी रक्त सळसळून उठेल असे होते. ही सिरीज अचानक सर्व प्लेटफॉर्मवरून हटवण्यात आली. का? माहीत नाही. मराठी माणूस पेटून उठू नये अशी इच्छा बाळगण्याऱ्यांचे हे कारस्थान तर नाही ना? तपासावे लागेल.' असं 'x' ट्विट अमेय खोपकरांनी केलं.
हे ही वाचा : मुंबईतील मतदार कोणती शिवसेना खरी मानतात? असेंडिया कंपनीचा सर्वात मोठा सर्व्हे; पाहा एका क्लिकवर
अखिल चित्रे काय म्हणाले?
अमेय खोपकर यांनी केलेल्या ट्विटमुळे चित्रपट क्षेत्रासह मुंबईच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यानंतर आता अखिल चित्रे यांनी देखील प्रतिक्रिया देत म्हणाले की, मराठी माणसाला आपल्या पूर्वजांनाचा संघर्ष बलिदान आणि इतिहासाची माहिती असावी. मुंबई महाराष्ट्राला लढून मिळवली आणि ती लढूनच टिकवावी लागेल, हा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यावश्यक आहे.
ADVERTISEMENT











