Astrology : श्रावणी सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी, 'या' राशींवर राहणार आशीर्वाद
Astrology : तिसरा श्रावणी सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी एकत्र आली आहे. भोलेनाथ आणि गणपत बप्पा यांच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. या आठवड्याची सुरूवात ही काही राशीतील लोकांसाठी दमदार असणार आहे. अशातच जाणून घ्या काही राशींचे आजचे राशीभविष्य.
ADVERTISEMENT

1/5
तिसरा श्रावणी सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी एकत्र आली आहे. भोलेनाथ आणि गणपत बप्पा यांच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ मिळणार आहे. या आठवड्याची सुरूवात ही काही राशीतील लोकांसाठी दमदार असणार आहे. अशातच जाणून घ्या काही राशींचे आजचे राशीभविष्य.

2/5
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आज शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. सर्दी-खोकल्यासारख्या छोट्या त्रासांची अधिक शक्यता आहे. कामात खर्च वाढण्याची अधिकची शक्यता आहे.

3/5
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी व्यापार आणि उत्पन्नाच अधिकची वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण मिळतील. छोटासा प्रवास किंवा पर्यटनाचा योग आहे.

4/5
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांचे शरीर आणि मन तंदुरूस्त राहण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठ मंडळींना प्रोत्सहान दिले जाईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, संवाद कौशल्याचा फायदा होणार आहे.

5/5
कन्या
सामाजिक क्षेत्रात होणारी प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन कपडे, दागिने किंवा वाहनाशी संबंधित खरेदी होऊ शकते. भागीदारांशी संबंध चांगलेच राहीत, दरम्यान, व्यवहारात यश मिळेल.
