मे महिन्याच्या 'या' तारखेपासून केतूची हालचाल, या राशींचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता
Astrology : काही राशींना याच काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. अशातच जाणून घेऊयात एकूण राशी कोणत्या.
ADVERTISEMENT

1/4
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, दुर्बौध ग्रह केतू 29 मे 2026 रोजी मघा नक्षत्राच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करेल. हे संक्रमण 30 जूनपर्यंत चालेल. या स्थानाचा स्वामी बुध असल्याने, तुमच्या बुद्धी आणि संवाद कौशल्यावर मोठा प्रभाव पडणार आहे. या काळात घेतलेले चुकीचे निर्णय तुमची सर्व मेहनत वाया घालवू शकतात. यामुळे काही राशींना याच काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. अशातच जाणून घेऊयात एकूण राशी कोणत्या.

2/4
मिथुन
मिथुन राशीसाठी हा काळ काही बाबतीत आव्हानात्मक असून केतूच्या प्रभावामुळे तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करणे टाळावे. अचानकपणे येणाऱ्या अडथळ्यांमुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. आपण मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तो दिवस पुढे ढकलावा.

3/4
कन्या
कन्या राशीच्या लोकांना पैसे कमावण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. केतूच्या प्रभावामुळे अस्वस्थ परिस्थिती निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी बॉस किंवा सहकाऱ्यांकडून दबाव वाढण्याची शक्यता आहे.

4/4
मीन
केतूच्या गोचरामुळे मीन राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला मानसिक थकवा आणि तणाव जाणवेल. या काळात कोणतेगी आर्थिक व्यवहार टाळा, कारण दिलेले पैसे बुडण्याची शकतात. वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ शकतात.









