Astro: कपाळावर टिळा लावल्याने बदलतं नशीब! तुम्हालाही होईल प्रचंड फायदा
कपाळावर टिळा लावणं ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर एक वैज्ञानिक आणि ज्योतिषीय चमत्कार देखील आहे. जाणून घ्या टिळा लावण्याचे योग्य नियम आणि फायदे!
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कपाळावर टिळा लावण्याचे फायदे
ज्योतिषशास्त्रानुसार, कपाळावर टिळा लावण्याच्या योग्य पद्धती
जीवनात सकारात्मक बदलांसाठी कपाळावरील टिळा कारणीभूत
Astro Tips: अमन नेहमी आत्मविश्वासाने त्याची कामं करत असायचा. मात्र, सध्या त्याल खूप विचित्र आणि वाईट अनुभव येत होते. कामात व्यत्यय, लक्ष विचलित होणे आणि मानसिक अस्वस्थता अशा बऱ्याच अडचणी त्याच्या आयुष्यात येत होत्या. एके दिवशी त्याच्या आजोबांनी त्याला दररोज टिळा लावण्याचा सल्ला दिला. आजोबांनी सांगितल्याप्रमाणे, अमनने ते करून पाहण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्याने नियमितपणे चंदन आणि केशरचा टिळा लावायला सुरुवात केली तेव्हा त्याची एकाग्रता तर वाढलीच पण त्यासोबतच आसपासचे वातावरणसुद्धा सकारात्मक झाले.
प्रसिद्ध ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांच्या मते, टिळा लावणे ही हिंदू परंपरेतील एक विशेष प्रथा आहे. टिळा लावल्याशिवाय पूजा करण्याची परवानगी नसते आणि ते लावल्याशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही. याशिवाय, टिळा लावल्याने कुंडलीत कोणतेही नकारात्मक ग्रह असतील तर ते देखील सुधारतात. ज्योतिषी शैलेंद्र पांडे यांनी टिळा लावण्याची योग्य पद्धत, नियम आणि त्याचे विविध प्रकारचे फायदे सांगितले आहेत. याविषयी, सविस्तर जाणून घेऊया.
टिळा लावण्याचे नियम
टिळा लावण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंघोळ करण्याआधी कधीच टिळा लावू नये. सकाळी अंघोळ करुन व्यवस्थित तयार व्हा. त्यानंतर पूजा करुन टिळा लावण्यास सुरूवात करा. पूजा करताना आधी देव्हाऱ्यातील देवाला जसे की भगवान कृष्ण किंवा नारायणाला मानत असलेल्यांनी त्यांना सर्वप्रथम टिळा लावा आणि त्यानंतर स्वत:ला लावा.
हे ही वाचा>> घरात ठेवलेली एक छोटी लवंग बदलेल तुमचं नशीब! आहेत प्रचंड चमत्कारिक फायदे
हातांवरील बोटांचा वापर
स्वत:ला टिळा लावायचा असल्यास अनामिका म्हणजेच रिंग फिंगरचा वापर करा आणि दुसऱ्याला टिळा लावायचा असल्यास अंगठ्याचा वापर करा.










