Personal Finance: 25 वर्षांचं Home Loan केवळ 10 वर्षात फिटेल, पण नेमकं कसं? फक्त 3 Tips ठेवा लक्षात!
आजच्या काळात स्वत:चं घर असणं हे प्रत्येकांचं स्वप्न असतं. यासाठी अनेकजण होम लोन म्हणजेच गृहकर्ज काढतात. मात्र, यामुळे महिन्याचा पागाराचा सगळ्यात मोठा हिस्सा हा EMI भरण्यासाठी जातो. यासाठी काही सोप्या टिप्स वापरुन दर महिन्याला होणारा EMI साठीचा खर्च कमी केला जाऊ शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गृहकर्ज (होम लोन) चा खर्च कमी करण्यासाठी टिप्स

25 वर्षांचं होम लोन 10 वर्षांतच कसं क्लोज करावं?

गृहकर्जाचा कालावधी कसा कमी होईल?
Home loan: सध्याच्या काळात स्वत:चं घर असणं हे सर्वात महागडं स्वप्नांपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकांना कर्ज म्हणजेच (Home Loan) घेण्याची गरज भासते. मात्र, यामुळे महिन्याचा पागाराचा सगळ्यात मोठा हिस्सा हा EMI भरण्यासाठी जातो. अशा परिस्थितीत, हे होम लोन लवकर संपावं असं प्रत्येकालाच वाटतं. यासाठी काही सोप्या टिप्स वापरुन दर महिन्याला होणारा EMI साठीचा खर्च आणि त्याचं ओझं अगदी बऱ्याच प्रमाणात कमी केलं जाऊ शकतं. याच्या 3 सोप्या टिप्स नक्की जाणून घ्या.
50 लाखांचं लोन आणि 40000 रुपयांचं EMI
आता असं समजा की तुम्ही 25 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचं होम लोन म्हणजेच गृहकर्ज घेतलं आहे. हे कर्ज तुम्हाला बँकेने 8.5 टक्के व्याजदराने दिले आहे आणि त्यानुसार तुमचा दर महिन्याचा EMI 40000 रुपये आहे. सुरुवातीच्या वर्षांप्रमाणे बँक तुमच्या कर्जावर जास्त व्याज आकारते. याचा अर्थ असा की 40000 रुपयांच्या EMI द्वारे तुम्ही 4.80 लाख रुपयांचे पेमेंट करता, परंतु तुमच्या कर्जाची मूळ रक्कम फक्त 60000 रुपयांनी कमी होते आणि 4.20 लाख रुपये फक्त व्याज भरण्यासाठी खर्च होतात.
हे ही वाचा: Minimum Amount Due in Credit Card: क्रेडिट कार्डच्या 'MAD' पेमेंटपासून सावधान! नाहीतर, खिशाला लागेल कात्री
पहिला मार्ग
जर तुम्हाला हे 25 वर्षांचे गृहकर्ज फक्त 10 वर्षात पूर्ण करायचे असेल, तर तुम्हाला योग्य स्ट्रॅटजी वापरून पैसे द्यावे लागतील. त्याची पहिली स्टेप म्हणजे तुम्ही दरवर्षी एक अतिरिक्त EMI भरावा म्हणजेच मासिक हप्त्याव्यतिरिक्त, 40000 रुपये अतिरिक्त पेमेंट करावे.