Personal Finance: महिन्याला 30 हजार पगार असेल तरी कर्ज घेण्याची गरज नाही, 'हा' फॉर्म्युला विसरू नका!

रोहित गोळे

Loan and Money Saving: आजच्या महागाईच्या काळात प्रत्येकाला कर्ज घ्यावं लागतं. अशा परिस्थितीत 40-30-20-10 हा नियम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

Personal Finance Tips for Loan: आजच्या काळात महागाईने मध्यमवर्गीय त्रस्त आहेत. कमी पगारात बजेट कसे बनवायचे? बचत कशी करायची? हे असे प्रश्न आहेत जे सामान्य माणसाच्या मनात सतत येत असतात. पगार येताच कर्जाचा ईएमआय, क्रेडिट कार्ड बिल, घरभाडे, वीज बिल, हे सगळं सुरू होतं. काही वेळातच पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँक खाते रिकामे होते. तुम्हाला काय खर्च झाला हेच कळत नाही? 

तुम्ही इतर कोणताही अतिरिक्त खर्च केलेला नसताना देखील पैसे नेमके कुठे खर्च झाले? अशा प्रश्न प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात नक्कीच येतो. म्हणून, आम्ही तुम्हाला Personal Finance च्या सीरिजमध्ये कमी पगारात तुमच्या घराचे बजेट कसे बनवायचे ते सांगणार आहोत. ज्यामुळे काही प्रमाणात मोठ्या समस्या टाळता येतात.

40-30-20-10 चा जबरदस्त फॉर्म्युला ठेवा लक्षात

तुम्ही जेव्हा तुमच्या घराचे बजेट बनवता तेव्हा 40-30-20-10 चा नियम लक्षात ठेवा. समजा, तुम्ही दरमहा 30 हजार रुपये कमावता. मग तुमच्या एकूण पगाराच्या 40% म्हणजे 12 हजार रुपये घरभाडे, वीज बिल, मुलांचे शिक्षण, घरातील वस्तू इत्यादी आवश्यक खर्चासाठी बाजूला ठेवा. त्यानंतर 30% म्हणजे 9 हजार रुपये खर्च हा इतर गोष्टींवर करा. प्रवास, बाहेर खाणे, चित्रपट पाहणे, मजा करणे यासाठी हे ठेवा. 

त्यानंतर, तुम्ही 20% म्हणजे 6 हजार रुपये आपत्कालीन निधीसाठी बँकेत ठेवू शकता. उर्वरित 10% म्हणजे 3 हजार रुपये तुम्ही एसआयपी म्हणून गुंतवू शकता.

'या' गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्ही या नियमाने तुमचे घराचे बजेट बनवले तर तुम्ही कर्ज, डिफॉल्टसारख्या सर्व समस्यांपासून दूर राहू शकता. या सर्वांसह, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. जे बचत करण्यात उपयुक्त ठरू शकतात.

  • तुमच्या खर्चाचा मागोवा घ्या. म्हणजेच महिन्यासाठी एक यादी बनवा. जेणेकरून तुम्हाला कुठे अनावश्यक खर्च होत आहे याची कल्पना येईल.
  • खरेदीला जाण्यापूर्वी तुमच्या आवश्यक वस्तूंची यादी बनवा. असे होईल की तुम्ही फक्त तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी कराल आणि त्या घरी आणाल.
  • मॉलच्या बाय-वन गेट टू पॉलिसीमध्ये अडकू नका. यामुळे अनेक वस्तू अनावश्यकपणे घरी येण्याची भीती असते.
  • तुम्ही खरेदीसाठी मॉलऐवजी किराणा दुकाने किंवा शोरूम वापरू शकता.
  • तुम्ही उत्सवाच्या काळात होणाऱ्या अनेक विक्रीचा फायदा देखील घेऊ शकता.
  • त्वरित वैयक्तिक कर्जाच्या जाळ्यात अडकू नका. हे अॅप्स वार्षिक 40 ते 50% दराने व्याज आकारतात.

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: पेन्शनबाबत येऊ शकते एक मोठी आणि चांगली बातमी, आतापासूनच सगळा प्लॅन ठरवून ठेवा!

2. Personal Finance: 50 व्या वर्षीच व्हा निवृत्त, तरीही मिळेल दर महिन्याला 1 लाख रूपये.. SWP प्लॅन आहे तरी काय?

3. Personal Finance: तुमच्या मुलाच्या जन्मापासून SIP करा सुरू, मिळतील 1 कोटी.. 21x10x12 फॉर्म्युला आहे जबरदस्त

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

15. Personal Finance: गुंतवणुकीवर किती पैसे मिळणार हे सत्य कोणीही सांगत नाही, 70 चा फॉर्म्युला तुम्हाला टाकेल हादरवून!

16. Personal Finance: LIC ची रक्कम किती असावी? 'हा' फॉर्म्युला खूप फायदेशीर

हे वाचलं का?

    follow whatsapp