सोनं खरेदीदारांचं टेन्शन वाढलं! आजही सोन्याचे दर कडाडले; 24 कॅरेट सोन्याचा भाव वाचून घामच फुटेल

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 700 रुपयांनी वाढली आहे.

ADVERTISEMENT

Today Gold Rate In Maharashtra
Today Gold Rate In Maharashtra
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 700 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचे दर 99370 रुपये झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव वाढल्याने सोन्याची मागणी वाढत असून दरही गगनाला भिडले आहेत. सोन्यासोबत चांदीच्या दरातही वाढ झाल्याचं समोर आलं आहे. चांदीचे दर 1500 रुपयांनी वाढल्याने प्रति किलोग्रॅमची किंमत 105500 रुपये झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99710 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91400 रुपये झाले आहेत.

पुणे 

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 99710 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91400 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?