पुण्याची गोष्ट : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' 'या' 3 मार्गांना जोडणार, फक्त 'ही' वाहने धावणार; प्रवास सुसाट होणार
Mumbai-Pune Highway Misiing Link : मुंबई - पुणे महामार्गाचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून 1 मे 2026 रोजी महामार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या नव्या महामार्गामुळे आता लोकांचा मोठ्या प्रमाणात लागणारा वेळ वाचण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'या' मार्गाना जोडणार मिसिंग लिंक
कोणत्या वाहनांना प्रवासासाठी मान्यता
पुण्याची गोष्ट : मुंबई - पुणे महामार्गाचा प्रवास आता आरामदायी होणार आहे. एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून 1 मे 2026 रोजी महामार्गाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या नव्या महामार्गामुळे आता लोकांचा मोठ्या प्रमाणात लागणारा वेळ वाचण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुण्यासाठी लागणारा वेळ आता कमी होईल आणि प्रवास सुसाट होईल.
हे ही वाचा : जुन्नर तालुक्यात दुर्दैवी घटना, शेततळ्यात बुडून दोन चिमुरड्यांचा अंत; ग्रामस्थ हळहळले
मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यांनी याबाबत ट्विट करत माहिती देखील दिली होती. एवढंच नाही, तर त्यांनी ट्विट करत या महामार्गाचे महत्त्व देखील पटवून दिलं होतं. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा तब्बल 30 मिनिटांचा कालावधी वाचणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा मार्ग टोल फ्री असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'या' मार्गाना जोडणार मिसिंग लिंक
माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या माहितीनुसार, येणाऱ्या भविष्यात हा मार्ग समृद्धी एक्सप्रेसवे कोकण किनारपट्टी कोस्टल रोड तसेच वसई-विरार मल्डीमोडल कॉरिडोरशी जोडला जाणार आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही भागात केवळ सात ते आठ तासांचा कालावधी लागू शकतो.
कोणत्या वाहनांना प्रवासासाठी मान्यता
1 मे 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हलकी मोटार वाहनांना प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहेत. तसेच मालवाहू वाहनांना या महामार्गावरून प्रवेश दिला नाही.









