जुन्नर तालुक्यात दुर्दैवी घटना, शेततळ्यात बुडून दोन चिमुरड्यांचा अंत; ग्रामस्थ हळहळले

मुंबई तक

Pune News : पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 28 एप्रिल 2026 रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं बल्लाळवाडी हादरून गेली आहे.

ADVERTISEMENT

Pune News
Pune News
google news

बातम्या हायलाइट

point

जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी शोकाकुल

point

शेततळ्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

Pune News : रायचंद शिंदे - पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 28 एप्रिल 2026 रोजी मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं बल्लाळवाडी हादरून गेली आहे. या घटनेनं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय. मृत मुलांची ओळख सोहम जयसिंग नवले (वय 12) आणि अभि महेश पवार (वय 10) समोर आली आहे. 

हे ही वाचा : कोल्हापूर हादरलं, 15 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत केले लैंगिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ बनवत वेगवेळ्या लॉजवर...

शेततळ्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

घडलेल्या घटनेनुसार, दुपारी सोहम आणि अभि खेळताना ती शेततळ्यात गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले. काही वेळानंतर ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी दोघांचाही शोध सुरु केला. दोघेही कुठेही सापडत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली, तेव्हा पोलीस आणि रेस्कू घटनास्थळी धावून आले. रेस्कूने दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढले. 

संबंधित शेततळे हे गाडेकर नावाच्या शेतकऱ्याच्या मालकी हक्काचे होते. सोहम आणि अभि हे दोघेही गरीब कुटुंबातील, अभ्यासू आणि खेळकर स्वभावाची मुले होती. त्यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जीवीत हानी होते, ती जीवीत हानी टाळण्यासाठी शेततळे, जलतरण, तलाव, केटी बंधारे अशा ठिकाणी अंघोळीसाठी कोणी जावू नये, असे आवाहन सरपंच संजय नायकोडी यांनी केले. 

हे ही वाचा : मिसिंग लिंकवरुन जाण्यास 'या' वाहनांना बंदी, वेग मर्यादा किती? कधी होणार खुला? शासनाकडून अधिसूचना जारी

दरम्यान, याआधी देखील शेततळ्यात बुडून तरुणांचा तसेच अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. पण, यासाठी पालकांनी देखील आपल्या मुलांची दक्षता घेणं गरजेचं आहे. 
 

हे वाचलं का?