Personal Finance: ‘चल ना, आज एन्जॉय करूया!’ मित्रांसोबतच्या प्लॅनमुळे बजेट का बिघडतं?

रोहित गोळे

मित्रांसोबत फिरताना Budget का बिघडतं? Social Pressure, Lifestyle आणि छोटे-छोटे खर्च तुमच्या बचतीवर कसा परिणाम करतात, हे जाणून घ्या. Social Spendingसाठी स्वतंत्र Budget कसं ठरवायचं आणि अनावश्यक खर्च कसा टाळायचा, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

personal finance tips for social spending picnic parties friends budget
Social Spending, Personal Finance, Budgeting, Spending Habits, Social Pressure, Lifestyle Inflation, Money Management, Saving Money,
Google CTA

मित्रांसोबत अचानक प्लॅन बनतो... ‘चल, आज बाहेर जाऊया!’ म्हणत सुरुवात होते आणि काही तासांत 500-1000 रुपयांचा खर्च सहज होतो. कधी रेस्टॉरंट, कधी कॅफे, कधी मूव्ही, कधी कॅब... आणि शेवटी बिल पाहिल्यावर लक्षात येतं की ठरवलेल्या बजेटपेक्षा बराच जास्त खर्च झालाय.

हा फक्त ‘जास्त खर्च’ करण्याचा विषय नाही. अनेकदा मित्रांचा ग्रुप, सोशल प्रेशर, इतरांचं अनुकरण आणि त्या क्षणी बजेटचा विचार न करण्याची सवय यामुळे Social Spending वाढतं.

महिन्याच्या सुरुवातीला बचतीचं लक्ष्य ठरवूनही महिनाअखेरीस पैसे कमी पडत असतील, तर तुमच्या खर्चाच्या यादीत Social Spendingचा वाटा किती आहे, हे एकदा तपासणं गरजेचं आहे. जाणून घेऊया मित्रांसोबत असताना Budget का बिघडतं?

1. ‘सगळे खर्च करतायत, आपणही करूया’ हा दबाव

ग्रुपमध्ये बहुतेक जण एखाद्या महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं ठरवतात. तुमच्या मनात मात्र बजेट असतं. पण ‘नाही’ म्हटलं तर आपण वेगळे दिसू, मित्र काय म्हणतील, असा विचार होतो. आणि मग बजेट बाजूला राहतं. याला Social Pressureचा प्रभाव म्हणता येईल.