सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर गडगडले; आजचे भाव वाचून आनंदच होईल

मुंबई तक

Today Gold Rate : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक दिवशी बदल होत आहेत.

ADVERTISEMENT

सोन्याचा दर:
सोन्याचा दर:
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात प्रत्येक दिवशी बदल होत आहेत. आज 24 जून 2025 रोजी सोन्याचे दर घसरले आहेत. भारतात आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे दर 10002 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9170 रुपये झाली आहे.

तर 18 कॅरेट सोन्याचे दर 7503 रुपये आहेत. देशात लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि गुंतवणुकीसाठी सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. तसच आज चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 1,09,000 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दर काय आहेत, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99870 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91550 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99870 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91550 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp