भर पावसाळ्यात सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटलाय घाम! सोन्याचे आजचे भाव वाचून तुम्हालाही धक्काच बसेल
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?
मुंबईत 1 तोळा सोन्याचा भाव काय?
Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. आज बुधवारी 11 जून 2025 रोजी भारतात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9855 रुपये झाली आहे.
तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचे भाव 9035 रुपयांवर पोहोचले आहेत. सतत वाढणारी महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांनी सोन्याची गुंतवणूक विचारपूर्वक करावी, असा सल्ला एक्सपर्ट देत आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय?
मुंबई
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 98400 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमेच भाव 90200 रुपये झाले आहेत.










