अहो राव! काय ते आजचे सोन्याचे भाव, 24 कॅरेट सोनं पुन्हा महागलं, तुमच्या शहरात आजचे दर काय?

मुंबई तक

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्याचं समोर आलंय.

ADVERTISEMENT

Today Gold Rate In Maharashtra
Today Gold Rate In Maharashtra
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Today Gold Rate : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात चढ-उतार होत असल्याचं समोर आलंय. सोन्याच्या 22 आणि 24 कॅरेटच्या प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 99300 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 90900 रुपये झाले आहेत. 

दरम्यान, राजधानी दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 91060 रुपये झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99180 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या प्रति किलोग्रॅमच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. आज 5 जून 2025 रोजी चांदीच्या प्रति किलोग्रॅमची किंमत 1,02,2000 रुपयांवर पोहोचली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मुंबई

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99600 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91300 रुपये झाली आहे.

पुणे 

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 99600 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 91300 रुपये झाली आहे.

हे वाचलं का?