7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार दिवाळी आधी देणार मोठं गिफ्ट - Mumbai Tak - central government employees 7th pay commission narendra modi government big gift before diwali increasing dearness allowance da big decision - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार दिवाळी आधी देणार मोठं गिफ्ट

मोदी सरकारकडून दिवाळी आधी आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठं गिप्ट देण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो आणि त्यामध्ये आता 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला तर मात्र दिवाळी आधीच कर्मचाऱ्यांना मोठं गिप्ट मिळणार आहे.
Updated At: Sep 21, 2023 11:53 AM
central government employees 7th pay commission narendra modi government big gift before diwali increasing dearness allowance da big  decision

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी आणखी चमकदार होणार आहे. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) दिवाळी आधीच (Dewali Gift) महागाई भत्त्यात वाढ करुन सणाआधीच एक मोठं गिप्ट देऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळतो आणि त्यामध्ये आता 3 टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे. सरकारने जर हा निर्णय घेतला तर महागाई भत्ता (DA) 45 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे पगारात मोठी वाढ होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (central government employees modi government big gift before diwali increasing dearness allowance da big  decision)

संशोधन 2 टप्प्यात

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यासाठी वर्षातून दोन वेळा संशोधन केले जाते. यावर्षीचे संशोधन 24 मार्च 2023 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर या महागाई भत्त्याचा लाभ कर्मचारी आणि वेतनधारकांना 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाली. त्यावेळी 38 वरुन 42 टक्क्यांनी डीएमध्ये वाढ झाली होती. तर यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करा अशी मागणी कर्मचारी करत आहेत. मात्र सरकारकडून 3 टक्केच वाढ करण्याची शक्यता आहे. जर ही वाढ करण्यात आली तर त्याचा फायदा 1 जुलै 2023 पासून मिळणार आहे.

हे ही वाचा >> Women Reservation Bill : महिला आरक्षण कायदा खरंच 2024 मध्ये लागू होईल का?

महागाईत वाढ, भत्त्यातही वाढ

महागाईचा दर लक्षात घेऊनच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येते. महागाईचा दर जेवढा जास्त असेल तेवढा जास्त महागाई भत्त्यात वाढ केली जाते. महागाई भत्त्याचा विचार केला जातो, त्यावेळी 1 जानेवारी आणि 1 जुलैच्या दरम्यानच संशोधन केले जाते. महागाई भत्त्याच्या वाढीच्या मानकांबद्दल विचार करायचा झाला तर सीपीआ-आय डब्ल्यूच्या आधारेच त्याचा विचार केला जातो. यावेळी जुलै 2023 मध्ये, CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे ०.९५ टक्के अधिक आहे. यापूर्वी जून महिन्यात ते 136.4 आणि मे महिन्यात 134.7 होते.

अधिकृत घोषणा नाही

केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी केंद्र सरकारच्यावतीने कोणत्याही अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. वेगवेगळ्या अहवालानुसार आणि कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.
महागाईच्या दरावर जर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जात असेल तर देशातील 1 कोटीपेक्षाही अधिक कर्मचारी आणि वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि जवळजवळ 69.76 लाख वेतनधारकांचा यामध्ये समावेश होणार आहे.

हे ही वाचा >> धक्कादायक ! यवतमाळमध्ये महिन्याभरात 15 शेतकऱ्यांनी संपवले आयुष्य

अशी होणार वाढ

केंद्र सरकारने जर हा निर्णय घेतला तर मात्र महागाई भत्त्यात वाढ होऊन कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 45 टक्के होणार आहे. जर 42 टक्के असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 18 हजार पगार असेल तर त्यांना 7 हजार 560 रुपये महागाई भत्ता मिळतो आणि जर यामध्ये 45 टक्के अशी वाढ झाली तर मात्र 8 हजार 100 रुपये होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पगारामध्ये 540 रुपयांना वाढ मिळणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन हे 56 हजार 900 रुपये असेल तर त्यामध्ये महागाई भत्ता हा 23 हजार 898 रुपये आहे, त्यातही 3 टक्क्यांनी वाढ झालीच तर त्यामध्ये 25 हजार 605 रुपयांनी वाढ होणार आहे.

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!