Chandrayaan-3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…,चांद्रयान 3 चे बजेट किती?

प्रशांत गोमाणे

Chandrayaan 3 Moon Landing : इस्त्रोच्या(ISRO) चांद्रयान 3 (chandrayaan 3) मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटानी चांद्रयान 3 चंद्राच्या पुष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.

ADVERTISEMENT

chandrayaan 3 budget less than hollywood intersteller movie elon musk tweet
chandrayaan 3 budget less than hollywood intersteller movie elon musk tweet
social share
google news

Chandrayaan 3 Moon Landing : इस्त्रोच्या(ISRO) चांद्रयान 3 (chandrayaan 3) मोहिमेकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कारण आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटानी चांद्रयान 3 चंद्राच्या पुष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश असणार आहे. अशात एकीकडे इस्त्रोच्या या मोहिमेची चर्चा सूरू असताना दुसरीकडे चंद्रयानच्या बजेटची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चंद्रयान 3 चे नेमके बजेट किती आहे? व या बजेटची जगभरात चर्चा होण्यामागचे कारण काय आहे हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 budget less than hollywood intersteller movie elon musk tweet)

जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी काही दिवसांपूर्वीच एक ट्वीट रिट्वीट केले होते. या रिट्वीटनंतर चंद्रयान 3 च्या बजेटची चर्चा सुरु झाली होती. खरं तर झालं असं की, सिंडा पोम नावाच्या एका पत्रकाराने चंद्रयानच्या बजेटबाबत एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये सिंडा पोम यांनी चांद्रयान 3 चे बजेट 75 मिलियन ड़ॉलर आणि इंटरस्टेलर सिनेमाचे बजेट 165 मिलियन ड़ॉलर असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पोम यांचे म्हणणे होते की, हॉलिवूड सिनेमा इंटरस्टेलर सिनेमाच्या बजेटपेक्षाही कमी किमतीत भारत चंद्रावर पोहोचतोय, असे त्यांचे म्हणणे होते. हेच ट्विट एलन मस्कने रिट्वीट करत भारतासाठी चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

हे ही वाचा : Chandrayaan-3 Landing: चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर कोणतं काम करणार?

एकूणच काय तर हॉलिवूडचा इंटरस्टेलर सिनेमा 165 मिलियन डॉलरमध्ये बनवला गेला होता. या हॉलिवूड सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी किमती भारताने चंद्रयान 3 ची मोहिम आखली आहे. भारत 75 मिलियन डॉलरमध्ये चंद्रावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे भारताचे हे बजेट अमेरीका, रशिया आणि चीनच्या बजेटपेक्षा खूपच कमी आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp