जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण! दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं? - dhangar morcha turned violent in jalna stone pelting collectors office vehicle vandalism - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण! दगडफेक, वाहनांची तोडफोड; नेमकं काय घडलं?

जालन्यात आज धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या  मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. भर दुपारच्या उन्हात हा मोर्चा जालना महापालिकेवर धडकला होता.
Updated At: Nov 21, 2023 17:21 PM
dhangar morcha turned violent in Jalna Stone pelting collector's office vehicle vandalism

Dhangar Morcha Turned Violent In Jalna : मराठा आंदोलन पेटलेल्या जालन्यातूनचा आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे. यातूनच आज धनगर समाजाच्या आंदोलकांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयालर दगडफेक आणि  वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. अचानक आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परीस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. (dhangar morcha turned violent in Jalna Stone pelting collector’s office vehicle vandalism)

मराठा आंदोलनानंतर आता राज्यात धनगर समाजही आक्रमक झाला आहे. जालन्यात आज धनगर समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या  मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. भर दुपारच्या उन्हात हा मोर्चा जालना महापालिकेवर धडकला होता.यावेळी धनगर आंदोलकांनी जालन्याचे जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी यांना आंदोलनाचे निवेदन स्विकारण्यासाठी बाहेर बोलावले होते.

हे ही वाचा : Team India : “वर्ल्ड कप जिंकलो असतो, पण पनौतीने…”, PM मोदींबद्दल राहुल गांधी काय बोलले?

मात्र आंदोलकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे जिल्हाधिकारी व उप जिल्हाधिकारी निवेदन स्विकारण्यास कार्यालयाबाहेर आलेच नाही. त्यामुळे भर उन्हात उभा असलेला धनगर समाज आक्रमक झाला आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात थेट शिरकाव करत  दगडफेक केली आणि बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण लागले होते.

सतंप्त धनगर आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला धक्का मारून आत शिरकाव केला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान पोलिसांनी देखील सतंप्त आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट

जालना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील सतंप्त आंदोलकांनी केलेल्या या हिंसक आंदोलनानंतर सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंसक आंदोलनावर गोपिचंद पडळकर काय म्हणाले?

जालन्यातील हिंसक आंदोलनावर गोपिचंद पडळकर यांनी टीव्ही9 ला प्रतिक्रिया दिली आहे. आज धनगर समाजाच्या वतीने राज्यभरात आंदोलन करून जिल्हाधकाऱ्यांना आरक्षणासाठी निवेदन देण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम शांततेत झाला. जालना जिल्हाधिकाऱ्यांना आधीच या आंदोलनाची माहिती दिली होती. जवळपास 25 ते 30 हजार लोक जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहेत. त्यामुळे तुम्ही निवेदन स्विकारण्यासाठी यावं किंवा सक्षम अधिकारी पाठवावा. धनगर समाजाची भावना ही स्वच्छ आणि स्पष्ट होती,असे धनगर नेते गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्विकारण्यासाठी येणार असल्याचेही सांगितले होते. पण जिल्हाधिकारी काही खाली आले नाही आणि कोणताही अधिकारी देखील पाठवला नाही. एक तास वाट बघितली तरी त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे समाजाच्या भावना अनावर झाल्या आणि संतापातून तोडफोडी झाल्या. या तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही असेही पडळकर यावर म्हणाले. तसेच गोपिचंद पडळकरांनी धनगर समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग