Viral News: शिक्षिकेने फेसुबक, इंस्टावर शेअर केले बिकिनी फोटो, शाळेने... - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Viral News: शिक्षिकेने फेसुबक, इंस्टावर शेअर केले बिकिनी फोटो, शाळेने…
बातम्या शहर-खबरबात

Viral News: शिक्षिकेने फेसुबक, इंस्टावर शेअर केले बिकिनी फोटो, शाळेने…

female teacher shared bikini photos on facebook and instagram school administration gave signal for action

Viral News: एका महिला शिक्षिकेला स्वत:चे बिकिनी फोटो (Bikini Photo) सोशल मीडियावर (Social Media) शेअर करणं आता बरंच महागात पडलं आहे. कारण तिच्या या कृत्यामुळे तिला चक्क नोकरीवरून काढून टाकण्याची मागणी होत आहे. लोकांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ हे अश्लील असल्याचे म्हटले आहे. मात्र, शिक्षिकेने आपला बचाव केला आहे. ट्रोल करणाऱ्यांनी प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमधला फरक समजून घ्यायला हवा, असं महिला शिक्षिकेने म्हटलं आहे. हे प्रकरण कॅनडामधील आहे. (female teacher shared bikini photos on facebook and instagram school administration gave signal for action)

नेमकं प्रकरण काय?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, क्रिस्टिन मॅकडोनाल्ड असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. सोशल मीडियावर ती ‘मिस एवा जेम्स’ म्हणून प्रसिद्ध आहे. क्रिस्टिनला शाळा व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणात आता अल्टिमेटम दिला आहे. जर तिने तिचे बिकिनीवरील फोटो पोस्ट करणे थांबवले नाही तर तिला काढून टाकले जाईल. असं स्पष्ट शब्दात शाळेच्या प्रशासनाने सांगितलं आहे.

यावर क्रिस्टिनने सांगितले की, ‘तिला शाळेच्या नोकरीतून मिळणारा पगार हा कमी आहे, त्यामुळे तिने अतिरिक्त उत्पन्नासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. पण यावर लोकं जो आक्षेप घेत आहे ते खरंच माझ्या समजण्यापलीकडचा आहे.’ क्रिस्टिन म्हणते की, ती शाळेच्या वेळेत या सर्व गोष्टी करत नाही. अशा परिस्थितीत नियम मोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिने शालेय व्यवस्थापनाला याबाबत कठोर शब्दात सांगितले देखील आहे की ती यापुढे देखील तिचे बिकिनीमधील फोटो पोस्ट करत राहील.

हे ही वाचा >> Rape Case: 17 वर्षाच्या वासनांध मुलीचा 2 अल्पवयीन मुलांवर बलात्कार, मुलीची आईही…

त्याच वेळी, व्यवस्थापनाचा दावा आहे की, क्रिस्टिन अडल्ट कंटेंट पोस्ट करते. त्यामुळे शाळेच्या प्रतिमेवर परिणाम होतो. मुलांवरही सकारात्मक परिणाम होत नाही. सध्या सोशल मीडियावर काही लोक क्रिस्टिनच्या समर्थनात आहेत तर काही विरोधात आहेत.

एका यूजरने म्हटले – ‘मॉडेलिंग करा किंवा शिकवा.’ दुसऱ्याने लिहिले – ‘शिक्षिकेने कोणताही नियम मोडला नाही. शाळेवर दबाव येत आहे.’ तिसरा म्हणाला – ‘एकत्र बसून प्रश्न सोडवा म्हणजे विद्यार्थ्यांवर परिणाम होणार नाही.’ तर आणखी एका युजरने लिहिले – ‘शिक्षकांनीही थोडे समजून घेतले पाहिजे.’

हे ही वाचा >> Crime: अंतर्वस्त्रावरुन राडा, पडला रक्ताचा सडा… 8 जण गंभीर जखमी

कसा झाला शिक्षिकेबाबत खुलासा?

असे सांगण्यात आले की, क्रिस्टिन ही बऱ्याच काळापासून टिकटॉक आणि अॅडल्ट साइटवर सक्रिय आहे. गेल्या आठवड्यात क्रिस्टिनच्या एका सहकाऱ्याने तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले. यामध्ये ती बिकिनी परिधान केलेली दिसून आली होती. त्यानंतर सहकाऱ्याने हा प्रकार शाळा व्यवस्थापनाला सांगितला. ज्यानंतर शाळेतील इतर शिक्षक आणि प्रशासनामध्ये बराच गोंधळ उडाला. क्रिस्टिनला तिचे फोटो हे अश्लील आणि अडल्ट असल्याचे सांगत अल्टिमेटम देण्यात आला. मात्र, क्रिस्टिन तरीही हार मानायला तयार नाही.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!