मशिदींवरच्या भोंग्याविरोधात हनुमान चालीसा पठण !नाशिकमध्ये मनसेचे ३३ कार्यकर्ते ताब्यात
नाशिकमध्ये आज सकाळ पासून मनसे कार्यकर्ते ज्या ठिकाणी नमाज पठण होत आहे तेथे हनुमान चालीसा लावायचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे याला काहीसा चाप बसला आहे. नाशिकच्या सातपूर येथील मशिदीसमोर ५ ते ७ कार्यकर्त्यांनी चालीसा लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुधबाजार येथे महिला कार्यकर्त्या जय श्रीराम नारे […]
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आज सकाळ पासून मनसे कार्यकर्ते ज्या ठिकाणी नमाज पठण होत आहे तेथे हनुमान चालीसा लावायचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या बंदोबस्तामुळे याला काहीसा चाप बसला आहे. नाशिकच्या सातपूर येथील मशिदीसमोर ५ ते ७ कार्यकर्त्यांनी चालीसा लावण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुधबाजार येथे महिला कार्यकर्त्या जय श्रीराम नारे देत मशिदीकडे जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी ३३ कार्यकर्ते पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हे काय दाखल जातात हे दुपारी स्पष्ट होईल.
नाशिकमध्ये एकाही धार्मिक स्थळावरील भोंग्यांची परवानगी नाही.
एकीकडे पुणे आणि मुंबईत धार्मिक स्थळावरील भोंगे लावण्यासाठी पोलीस परवानगी देत असताना नाशिक पोलिसांनी आतापर्यंत एक ही परवानगी दिलेली नाही, नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण ६० अर्ज आलेले त्यापैकी ३९ अर्ज निकाली काढले असून एकालाही भोंग्यांसाठी परवानगी देण्यात आलेली नाही, पोलिसांच्या नुसार सर्वांनी पहाटे पासून सरसकट परवानगी मागितली होती , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देता येते हे कारण पुढे करत परवानगी दिली नाहीये,