अखेर मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. अनुकूल परिस्थितीमुळे पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे. ‘राज्यातील मान्सूनच्या पुढील प्रवासास हवामान अनुकूल होत असून, येत्या २-३ दिवसांत मान्सूनचे महाराष्ट्राच्या अजून काही विभागात आगमन होऊ शकते,’ असं णे हवामान विभागाच्या केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
१४ जूनपर्यंत राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मान्सूनच्या मार्गक्रमणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
“पुढील ४८ तासांत, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटकचा आणखी काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यापुढील २ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल असेल,” असं त्यांनी म्हटलेलं आहे.
राज्यातील मान्सूनच्या पुढील प्रवासास हवामान अनुकूल होत असून येत्या २-३ दिवसांत मान्सूनचे महाराष्ट्राच्या अजून काही विभागात आगमन होऊ शकते.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2022
पुढील चार दिवसांत कसं असेल हवामान?
१० जून…
शुक्रवारी (१० जून) राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
११ जून…
शनिवारी (११ जून) राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
१२ जून…
रविवारीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. शनिवारी (११ जून) राज्यातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
१३ जून…
रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. तर इतर जिल्ह्यात हवामान सर्वसामान्य राहण्याची शक्यता आहे.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3ztCY भेट द्या pic.twitter.com/dNzZiG2dTs
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 10, 2022
१४ जून…
मंगळवारी (१४ जून) राज्यातील सिंदुधुर्ग, पुणे, नाशिक, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.