दिराला वहिनीसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध, सासू-सासऱ्यांसमोरच केला कांड
बिहारमधून एका तरुणाला आपली वहिनीच खूप आवडल्यामुळे त्याने तिच्या माहेरी जाऊन भलताच कांड केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वहिनीसोबत होते दिराचे प्रेमसंबंध

माहेरी जाऊन सासू- सासऱ्यांसोबत भलताच कांड...
Bihar News: बिहारमधून एक चकित करणारी बातमी समोर आली आहे. एका तरुणाला आपली वहिनीच खूप आवडली आणि तो तिला थेट तिच्या माहेरी घेऊन गेला. इतकेच नव्हे तर सासू आणि सासऱ्यांसमोर त्याने जे काही केलं त्यांना सर्वांनाच मोठा धक्का बसला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
वहिनीसोबतच केलं लग्न
बिहारमधील सहरसा गावात ही घडल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी मनोहर यादव आपल्या वहिनीला तिच्या माहेरी सोडण्यासाठी तिच्यासोबत पिपरा पोलीस स्टेशन परिसरातील गेलिया गावात गेला होता. त्यावेळी मनोहरचा भाऊ आनंद यादवने त्याला परत का येत नाही? असं विचारलं. त्यावेळी मनोहर आपल्या भावाला नको ती कारणं सांगत राहिला. मात्र, काही दिवसांनंतर मनोहरने तिच्या वहिनीसोबतच लग्न केल्याची बातमी समोर आली. या घटनेतील आश्चर्याची बाब म्हणजेच दिर आणि वहिनीचं लग्न मुलीच्या आई-वडिलांनीच लावून दिलं होतं. आपल्या बायकोच्या अशा करनाम्याबद्दल कळताच आनंदच्या पायाखालची जमिनच सरकली.
हे ही वाचा: 4 महिला 'या' गोष्टी करताना रंगेहाथ सापडल्या, गावातलं सेक्स रॅकेट पाहून गावकरीही चकीत!
आरोपीच्या पतीने केली तक्रार
या घटनेमुळे आनंदला मोठा धक्का बसला. त्याने पोलिसात जाऊन याबद्दल तक्रार केली. त्यावेळी आनंद पोलिसांना म्हणाला, "मला माझा भाऊ, पत्नी आणि सासू-सासऱ्यांनी धोका दिला. माझ्याच बायकोने तिच्या दिरासोबत म्हणजेच माझ्या भावासोबत लग्न केलं. माझा भाऊ आणि माझ्या पत्नीला समोर आणा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. पोलिसांनी तपास सुरू केला असता दोघे आरोपी म्हणजेच दिर आणि वहिनी बेपत्ता असल्याचं समोर आलं.
हे ही वाचा: 'जय गुजरात', पुण्यात अमित शाहांसमोर एकनाथ शिंदे यांची घोषणा!
दोघांचा शोध
सध्या पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे दोघांचा शोध घेतला आहे. या प्रकरणातील आरोपी दिर आणि वहिनीचे आधीपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेचं एक वर्षापूर्वी तक्रारदार आनंद यादवशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही काळातच तिचे आपल्या दिरासोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र, याबद्दल अद्याप पुष्टी करण्यात आली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. स्थानिक लोकांमध्ये या घटनेला घेऊन मोठ्या प्रमाणात चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.