दाजी-मेव्हणीला मिळाला एकांत अन् झाली चूक, अनैतिक शारीरिक संबंध अन् थेट..

मुंबई तक

उत्तर प्रदेशातून दाजी आणि मेव्हणीच्या नात्याला लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. दाजी आणि मेव्हणीने एकमेकांच्या प्रेमात सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. सगळ्या प्रकारानंतर त्या दोघांनी जे काही केलं त्यामुळे त्यांना थेट तुरुंगात जावं लागलं.

ADVERTISEMENT

दाजी आणि मेव्हणीचे अनैतिक संबंध (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
दाजी आणि मेव्हणीचे अनैतिक संबंध (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दाजी आणि मेव्हणीचे अनैतिक संबंध

point

शारीरिक संबंध अन् मोठी चूक

point

नेमकं काय घडलं?

UP News: उत्तर प्रदेशातून दाजी आणि मेव्हणीच्या नात्याला लाज आणणारी एक घटना समोर आली आहे. दाजी आणि मेव्हणीने एकमेकांच्या प्रेमात सगळ्या मर्यादाच ओलांडल्या. त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यातून मेव्हणी गरोदर राहिली. इतकेच नव्हे तर कोणालाच याबद्दल कळू नये, यासाठी दाजीने मेव्हणीला गर्भपात करण्यास भाग पाडलं. मात्र, या सगळ्या प्रकारानंतर त्या दोघांनी जे काही केलं त्यामुळे त्यांना थेट तुरुंगात जावं लागलं. 

दोघांनीही शहरातील एका कचराकुंडमतील आरोपींचा शोध लागला. यामध्ये त्या मेव्हणी आणि दाजीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. याबद्दल दोघांच्या घरी बातमी पोहोचताच आरोपीची बहीण म्हणाली, "जर पोलिसांनी आम्हाला हे सर्व सांगितले नसते तर मला हे कधीच कळले नसते. माझ्या नवऱ्याने आणि बहिणीने मला आणि आमच्या कुटुंबाला फसवले आहे."

हे ही वाचा: दिराला वहिनीसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध, सासू-सासऱ्यांसमोरच केला कांड

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलं अर्भक

एसएसपी संजय कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 24 जून रोजी रुडकी चौकी चुंगीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्भक आढळून आलं. त्यावेळी पोलिसांनी अझात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करून आरोपीचा तपास घेण्यास सुरूवात केली. या तपासात कोतवाली नगरचे प्रभारी निरीक्षक उमेश रोरिया यांनी त्यांच्या टीमसोबत घटनास्थळाच्या परिसरात बसवलेल्या जवळपास 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.

हे ही वाचा: 4 महिला 'या' गोष्टी करताना रंगेहाथ सापडल्या, गावातलं सेक्स रॅकेट पाहून गावकरीही चकीत!

दाजी आणि मेव्हणीवर कारवाई

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उत्तरी रामपुरीचा रहिवासी असलेला अभिषेक आणि त्याची मेव्हणी प्रियाला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास केला असता अभिषेक आणि प्रिया यांचे अवैध संबंध असल्याचे समोर आले. त्यांच्या अवैध संबंधांमुळे प्रिया गर्भवती राहिली. तसेच त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही कळू नये म्हणून प्रियाला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्या दोघांनी अर्भक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिलं. अर्भक 6 महिन्यांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांना हे कळताच या घटनेची चौकशी करण्यात आली. तसेच, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोप कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp