Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?
Chandrayaan 3 : देशाच्या चांद्रयान 3 या मोहिमेमुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागून राहिले होते. चांद्रयान 3 च्या (chandrayaan 3) विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यामुळे जगात भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान 3 च्या यशात इस्रोचे (ISRO) प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड मोठी मेहनत दिसून येत आहे. ही संपूर्ण यशस्वी मोहिम इस्रोचे […]
ADVERTISEMENT

Chandrayaan 3 : देशाच्या चांद्रयान 3 या मोहिमेमुळे साऱ्या जगाचे लक्ष भारताकडे लागून राहिले होते. चांद्रयान 3 च्या (chandrayaan 3) विक्रम लँडर चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यामुळे जगात भारताने नवा इतिहास रचला आहे. चांद्रयान 3 च्या यशात इस्रोचे (ISRO) प्रकल्प संचालक पी वीरामुथुवल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड मोठी मेहनत दिसून येत आहे. ही संपूर्ण यशस्वी मोहिम इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाली आहे.
थक्क करणारा रंजक प्रवास
एस सोमनाथ हे स्पेस इंजीनियरिंगबरोबरच ते या संबंधात अनेक गोष्टींमध्ये त्यांना तज्ज्ञ मानले जाते. वयाच्या 57 व्या वर्षी ते इस्रोचे प्रमुख झाले आहेत. त्यामुळे या मोहिमेपर्यंतचा त्यांचा प्रवास रंजक आहे आणि त्यांच्या या यशाच्या प्रवासासह रंजक आहे.
हेही वाचा : Chandrayaan-3 : हॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी खर्च…,चांद्रयान 3 चे बजेट किती?
शाळा ते आयआयटी
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची जानेवारी महिन्यामध्ये त्यांची इस्रोच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती. इस्त्रोच्या प्रमुखपदी येण्याआधी एस सोमनाथ यांची विक्रम साराभाई आंतरिक्ष केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वी काम केले होते. त्या एस सोमनाथ यांचा जन्म जुलै 1963 मध्ये केरळमधील अलापुझा जिल्ह्यात झाला. एस सोमनाथ यांचे पूर्ण नाव श्रीधर परिकर सोमनाथ आहे.
अभ्यासतही टॉपरच
सोमनाथ यांचे प्रारंभीचे शिक्षण स्थानिक शैक्षणिक संस्थेमधून झाला. त्यानंतर सोमनाथ यांना केरळमधील कोल्लममधील टीकेएम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्याच कॉलेजमधून त्यांनी मॅकेनिकल इंजीनिअरिंगची पदवी घेतली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना अभ्यासातही ते अगदी टॉपर होते.