Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीसांच्या बजेटमध्ये मराठवाड्याला काय मिळालं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Budget 2023, Marathwada: देवेंद्र फडणवीस राज्याचा आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात राज्यातील जनतेसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ, मध्य-उत्तर महाराष्ट्र, कोकण या विभागानिहायही काही घोषणा केल्या. फडणवीसांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मराठवाड्यासाठी नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या, ते पाहुयात…

– मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे मान्यतेला

– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यांना जायकवाडी धरणातून पाणी

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– बीड, लातूर जिल्ह्यांसाठी जायकवाडी, माजलगाव, उर्ध्वमनार धरणातून पाणी

– धाराशिव जिल्ह्यासाठी उजनी, सीना कोळेगाव, निम्नतेरणा धरणातून धरणातून पाणी

ADVERTISEMENT

-छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार

ADVERTISEMENT

-विदर्भाबरोबर मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत दिली जाणार. ही मदत अन्नधान्याऐवजी रोख रक्कमेच्या स्वरुपात असेल आणि थेट आधार बँक खात्यात जमा होणार.प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये इतकी रक्कम असणार.

-विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये

– दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार. मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार. मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला याचा लाभ होणार.

-कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ, या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

– पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग/86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)

(माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)

– या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ

– सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये

– नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार

– छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी

– छत्रपती संभाजीनगर येथे सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

-धाराशिव, परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार

– पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास

– जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती

– विचारवंत कै. नरहर कुरुंदकर स्मारक, नांदेडसाठी निधी

– भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या पाचही महाराष्ट्रातील ज्योर्तिंलिंगांसह प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी : 300 कोटी रुपये

– श्री चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी

– मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त पुरेसा निधी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT