Maharashtra Weather: आषाढी एकादाशीला कसा असेल पाऊस? पुण्यासाठी रेड तर कोकणात ऑरेज अर्लट जारी
Maharashtra Weather Update: आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. पाहा तुमच्या जिल्ह्यातील नेमकं वातावरण कसं असेल.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार आज (6 जुलै 2025) रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल. यावेळी हवामान खात्याने पुणे आणि घाटमाथ्यावरील परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे तर ठाणे आणि कोकण किनारपट्टी भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. जाणून घ्या कोणत्या भागात नेमकं कसा पाऊस बरसेल.
मुंबई आणि कोकण
6 जुलै रोजी मुंबईत आकाश ढगाळ राहील, आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील येऊ शकतो. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्याचा धोका आहे. यावेळी पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: मुंबईच्या कबुतरांचा विषय थेट विधानसभेत, गुटर्गुमुळे लागलीय वाट, तरी...
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसंच समुद्रकिनारी वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली)
पुणे आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यामुळे इथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरमध्ये 5 जुलै रोजी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. याशिवाय
सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भ
मराठवाडा (औरंगाबाद, जालना, बीड): मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> मुंबईची खबर: भुयारी बोगद्याच्या बांधणीला गती... वन खात्याची "इतकी" जागा पालिकेला मिळणार!
विदर्भ (नागपूर, अमरावती, चंद्रपूर): पूर्व विदर्भात हलक्या पावसासह जोरदार वाऱ्यांचा इशारा आहे. नागपूर आणि चंद्रपूरमध्ये 6 जुलै रोजी हलका पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे येथेही येलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, जळगाव, धुळे)
- नाशिक आणि जळगावमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पण नाशिक आणि काही ठिकाणी गारपिटीचा धोका आहे. तर धुळ्यात हलक्या सरींसह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) नमूद केले आहे की, 6-7 जुलै दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.