मुंबईची खबर: मुंबईच्या कबुतरांचा विषय थेट विधानसभेत, गुटर्गुमुळे लागलीय वाट, तरी...
कबुतरांमुळे आरोग्यावर होणार घातक परिणाम लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले. मात्र, 'या' कबुतरखान्याच्या ठिकाणी कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश
मात्र 'या' कबुतरखान्यांच्या ठिकाणी कारवाई झालीच नाही...
कबुतरांमुळे आरोग्याला कोणता धोका?
Mumbai News: कबूतर बऱ्याच आजारांसाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे घराच्या आसपास कबूतर येऊ नयेत, यासाठी बरेच उपाय केले जातात. कबूतरांच्या विष्ठेतील बुरशी तसेच जंतू आणि परजीवी माणसांमध्ये विविध आजार पसरवतात. कबुतरांमुळे आरोग्यावर होणार घातक परिणाम लक्षात घेऊन मंत्री उदय सामंत यांनी मुंबई महापालिकेला मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश दिले.
मुंबईमध्ये एकूण 51 कबूतरखाने असून त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दादर पश्चिमेकडील कबूतरखाना सोडला तर इतर कोणत्याच ठिकाणी कारवाई करण्यात आली नसल्याचं समोर आलं. यासंदर्भात कौन्सिलच्या लोकप्रिय सदस्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांमुळे त्यांचा जवळचा नातेवाईक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली. त्यानंतर महापालिकेला एका महिन्याच्या आत कबुतरखान्यांविरुद्ध जागरूकता मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
कबुतरखान्यांविरुद्ध तक्रार आल्यास दंड
कबुतरखान्यांविरुद्ध तक्रार आल्यास महापालिकेकडून वॉर्डस्तरावर 500 रुपये दंड अशी कारवाई केली जाते. याबाबतीत विधानपरिषदेच्या चर्चेनंतर मुंबईतील 51 कबुतरखान्याच्या ठिकाणी कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दादर पश्चिमेकडील कबुतरखान्या व्यतिरिक्त इतर कोणत्याच ठिकाणी ही कारवाई करण्यात आली नाही.
लोकांनी पालन न केल्याने पुन्हा उघडण्यात...
विधानपरिषदेतील घोषणेनंतर 'जी उत्तर' वॉर्डमधील संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी जाऊन कबुतरांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गोण्या जप्त केल्या. या कारवाईनंतर दादरमधील प्रसिद्ध कबुतरखाना दोन दिवसांसाठी बंद होता, पण लोकांनी त्याचे पालन न केल्याने आणि कबुतरांना खायला घालत राहिल्याने ते पुन्हा उघडण्यात आले असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.









