MSBSHSE’ 12वीचा ऑनलाइन निकाल जाहीर, तुमची मार्कशीट mahresult.nic.in वर

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra hsc result 2023 msbshse 12th online result declared your marksheet at mahresult.nic.in
maharashtra hsc result 2023 msbshse 12th online result declared your marksheet at mahresult.nic.in
social share
google news

Maharashtra HSC Result 2023: पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड बारावी 2023 निकाल (Maharashtra HSC result 2023) जाहीर करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता बोर्डाने संपूर्ण राज्याचा निकाल जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल हा 91.25 टक्के एवढा लागला आहे. (maharashtra hsc result 2023 msbshse 12th online result declared your marksheet at mahresult.nic.in)

बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थी निकाल पाहू शकतात.

2023 शाखानिहाय निकाल (HSC Result : Streamwise Result 2023)

  • कला (Arts) – 84.05 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते
  • वाणिज्य (Commerce) – 90.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले
  • विज्ञान (Science) – 96.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational courses) – 89.25 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते
  • बारावीचा एकूण निकाल – 91.25 टक्के

या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

results.mkcl.org

हे ही वाचा >> Maharashtra HSC Result 2023: 12वीचा निकाल, mahresult.nic.in वरुन करा मार्कशीट डाऊनलोड

HSC Result 2023: पाहा विभागानुसार निकाल

  1. कोकण – 96.01 टक्के
  2. पुणे – 93.34 टक्के
  3. कोल्हापूर – 93.28 टक्के
  4. अमरावती – 92.75 टक्के
  5. छत्रपती संभाजीनगर – 91.85 टक्के
  6. नाशिक – 91.66 टक्के
  7. लातूर – 90.37 टक्के
  8. नागपूर – 90.35 टक्के
  9. मुबंई – 88.13 टक्के

हे ही वाचा >> Maharashtra HSC Result 2023: 12 वीचा निकाल जाहीर, तुमचा विभाग कितवा?

महाराष्ट्र बारावी निकाल 2023 – mahresult.nic.in वर कसा पाहाल तुमचा निकाल?

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने HSCचा निकाल result.mh-ssc.ac.in वर जाहीर करण्यात आला आहे.
  • HSC Result 2023 – निकाल नेमका कसा पाहाल?
  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.in यावर जाहीर करणार आहे.
  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2023 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज सुरु होईल.
  • यावेळी विद्यार्थ्यांना त्यांचा जो सीट नंबर किंवा नोंदणी क्रमांक देण्यात आलेला असेल तो टाकावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना Submit हे बटण दाबावं लागणार आहे.
  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर M584712 असेल आणि तुमच्या आईचे नाव ‘सुजाता’ असं असेल तर तुम्ही M584712 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUJ असं टाकावं लागेल.
  • त्यानंतर Submit या बटणावर क्लिक करा आणि आपला निकाल आपल्यासमोर काही क्षणात दिसू लागेल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT