परभणीत मॉब लिंचिंग! तीन तरुणांवर तुटून पडले, एकाचा जागेवरच मृत्यू
परभणीमध्ये मॉब लिंचिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी परभणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध अद्यापही सुरू आहे.
ADVERTISEMENT

Latest news in Marathi: दिलीप माने, परभणी: परभणीमध्ये (Parbhani) मॉब लिंचिंगचं (Mob Lynching) प्रकरण समोर आले आहे. येथे जमावाने शेळ्या चोरल्याच्या संशयावरून तीन मुलांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. खरे तर हे प्रकरण परभणी तालुक्यातील उखलद गावाशी संबंधित आहे. येथे शेळ्या चोरल्याच्या संशयावरून जमावाने तीन मुलांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. (maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot)
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीन मुलांना जमावाच्या तावडीतून सोडवून थेट रुग्णालयात नेले. यावेळी उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चौघांना अटक देखील केली आहे. तर इतरांचा आरोपींचा शोध सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव किरपान सिंह सुजीतसिंह भाऊड असं आहे. किरपान सिंह आणि त्याचे दोन साथीदार हे हे उखलद गावातील निर्मनुष्य ठिकाणी संशयितरित्या फिरत होते. त्यामुळे गावकऱ्यांना ही तीनही मुलं चोर असल्याचं वाटलं आणि गावातील एका टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा >> नरेंद्र मोदींचा ‘क्लास’, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?
यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी मुंबई Tak च्या प्रतिनिधीने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी देखील संपर्क साधला. मात्र, त्यांनीही बोलण्यास नकार दिला.