Maharashtra SSC Result 2023 : निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल - Mumbai Tak - maharashtra ssc result 2023 announced how download marksheet - MumbaiTAK
बातम्या शहर-खबरबात

Maharashtra SSC Result 2023 : निकालाचा टक्का का घसरला? राज्यात कोकण अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) शुक्रवारी (2 मे) जाहीर केला.
Updated At: Jun 02, 2023 16:19 PM
Maharashtra Class 10th SSC Result 2023 declared. konkan board first in the state.

Maharashtra SSC Result 2023 latest update : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल (MSBSHSE SSC Result) शुक्रवारी (2 मे) जाहीर केला. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट झाली आहे. (Maharashtra class 10 SSC Result 2023 news in marathi)

राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाची घोषणा केली. यंदाच्या निकालात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 98.11 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 92.05 टक्के इतका लागला आहे.

मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 151 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले असून, 66 हजार विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर, 1 लाख 9 हजार 344 विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण मिळाले आहेत.

Maharashtra class SSC Result 2023 : गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात घट का झाली?

यंदा दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 3.11 टक्क्यांनी घटला आहे. मार्च २०२० च्या निकालाशी तुलना केल्यास यंदाचा निकाल 1.47 टक्क्यांनी कमी लागला आहे.

राज्याचा निकालाचा टक्का घसरण्याचं कारण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लेखी परीक्षा घेतली गेली नाही. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्यात आला होता.

Video >> ‘काहीही लागलं तर मी आहे’, अंथरुणाला खिळलेल्या शिवसैनिकाला शिंदेंचा व्हिडीओ कॉल

यंदा परीक्षा होणार की नाही या बाबत साशंकता होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नेहमीप्रमाणे लेखी पद्धतीने परीक्षा घेण्याची भूमिका घेऊन राज्य मंडळाने परीक्षेचे नियोजन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक शाळेवर परीक्षा केंद्र, अर्धा तास अधिक वेळ, 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा >> Maharashtra Politics : शिंदेंच्या खासदाराची ‘ही’ मागणी शिवसेना-भाजप सरकारचं टेन्शन वाढवणार?

दहावी परीक्षेवेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला होता, तरी परिस्थिती आव्हानात्मक होती. विद्यार्थ्यांनी या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात परीक्षा दिली ही महत्त्वाची बाब आहे. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे दहावीच्या परीक्षेचे आयोजन करणे शक्य झाले. पुढील परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आणि पारंपरिक पद्धतीनेच आयोजित करण्यात येईल”, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

हेही वाचा >> Wrestlers Protest : 7 तक्रारी… ब्रिजभूषण सिंह यांच्यावर नेमके आरोप काय?

परीक्षेसाठी नोंदणी झालेले विद्यार्थी – 15 लाख 41 हजार 666
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या – 15 लाख 29 हजार 96
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी – 14 लाख 34 हजार 898

maharashtra ssc result 2023 link official website : इथे पाहता येणार निकाल

दहावीचा निकाल खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

– mahresult.nic.in
– https://ssc.mahresults.org.in
– http://sscresult.mkcl.org

How to check ssc Result 2023 : असा बघा निकाल

विद्यार्थ्यांनो, दहावीचा निकाल पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या mahresult.nic.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या. संकेतस्थळाच्या होमपेजवर Maharashtra Examination 2023 – RESULT या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर SSC Examination February- 2023 RESULT या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नव्या पेजवर Roll Number आणि आईचे नाव टाका. त्यानंतर लगेच तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. मार्कशीट म्हणजेच गुणपत्रक बघा. त्यानंतर त्याची प्रिंट घ्या.

Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात चिकन खा अन् Weight Loss करा! कमी वयात IAS-IPS झालेल्या 5 तरुणांची प्रेरणादायी कहाणी स्वत:साठी फक्त 5 मिनिटे काढा अन् दिवसाची सुरूवात ‘या’ 8 योगा स्टेप्सने करा! झटपट Weight Loss करायचंय? मग ‘हे’ 8 Snacks खाऊनच बघा… ‘गाव की गोरी बनली, शहर की छोरी’; अभिनेत्रीने केलं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन अभिनेत्रीचा फुल ऑन फायर हॉट फिगर; कारण फॉलो करते ‘हा’ Diet Plan 162 किलोच्या IT इंजिनिअरने घटवलं 65 किलो वजन; कोणता सीक्रेट डाएट केला फॉलो? Weight Loss करताय? मग, वर्कआउटनंतर ‘हा’ डाएट करा फॉलो या गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्तीही जाऊ शकते निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण?