मुंबईतल्या जे. जे. रूग्णालयात सापडलं ब्रिटिशकालीन भुयार! १३० वर्षांपूर्वीचं भुयार आढळल्याने आश्चर्य
मुंबईतल्या सर जे. जे. रूग्णालयात ब्रिटिशकालीन भुयार सापडलं आहे. हे भुयार १३० वर्षे जुनं आहे अशी माहिती समोर येते आहे. रूग्णालयातील डी. एम. पेटीट या इमारतीत हे १३० वर्षांपूर्वीचं भुयार सापडलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. इमारतीचा हा भाग नर्सिंग कॉलेजचा असल्याचीही माहिती समोर आली आहे. बुधवारी पाहणी करताना आढळलं भुयार जे. […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या सर जे. जे. रूग्णालयात ब्रिटिशकालीन भुयार सापडलं आहे. हे भुयार १३० वर्षे जुनं आहे अशी माहिती समोर येते आहे. रूग्णालयातील डी. एम. पेटीट या इमारतीत हे १३० वर्षांपूर्वीचं भुयार सापडलं आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. इमारतीचा हा भाग नर्सिंग कॉलेजचा असल्याचीही माहिती समोर आली आहे.
बुधवारी पाहणी करताना आढळलं भुयार
जे. जे. रूग्णालयात ब्रिटिशकालीन भुयार आढळल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. बुधवारी रूग्णालय परिसराची पाहणी करत असताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या. त्यानंतर कुतुहूल म्हणून अधिकाऱ्यांनी सखोल पाहणी केली. त्यावेळी एक झाकण काढल्यानंतर त्या ठिकाणी पोकळी असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने पुढची पाहणी पूर्ण करत असताना एक अख्खं भुयारच या ठिकाणी असल्याचं आढळून आलं आहे.
डॉ. अरूण राठोड यांना दिसलं भुयार
डॉ. अरुण राठोड यांना हे भुयार दिसल्यानंतर त्यांनी लगेचच पुरातत्व विभागाला आणि स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. हे भुयार २०० मीटर लांबीपर्यंत आहे. इमारतीची बांधकाम हे १३० वर्ष जुने असल्यानं हे भुयारही १३० वर्ष जुने असल्याचं सांगण्यात येत आहे.
जे.जे रुग्णालयात सापडलेले भुयार हे डिलिव्हरी वॉर्ड ते चिल्ड्रन वॉर्डपर्यंत असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली आहे. सर जे.जे रुग्णालयाची वास्तू आणि परिसरातील बऱ्याच भागांमध्ये ब्रिटिशकालीन इमारती आहेत. त्यातच आता सापडलेल्या भुयाराबाबत मुंबई जिल्हाधिकाऱ्यांकडे माहिती देण्यात आली आहे. दरम्यान. जे.जे रुग्णालयाच्या इमारतींचे १७७ वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होती. सर जमशेदची जिजीभॉय आणि सर रॉबर्ट ग्रँट यांच्या सहकार्याने ही इमारत बांधण्यात आली होती.