Amruta Fadnavis : "कशी नशिबाने थट्टा आज मांडली" गाणं ऐकून उद्धवजींचाच चेहरा समोर आला

अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर चांगलंच चर्चेत आहे
amruta fadnavis as a guest and talk about uddhav thackeray
amruta fadnavis as a guest and talk about uddhav thackeray

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या एक चांगल्या गायिका आहेत. त्याचप्रमाणे त्या त्या त्यांच्या बिनधास्त ट्विट्ससाठी आणि तेवढ्याच मनमोकळ्या स्वभावासाठी ओळखल्या जातात. बस बाई बस या कार्यक्रमात अमृता फडणवीस आल्या होत्या तेव्हा त्यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली. याच कार्यक्रमात एक राऊंड होता जिथे गाणं ऐकून कुठली व्यक्ती आठवते हे सांगायचं होतं. या राऊंडमध्ये अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस उद्धव ठाकरेंबाबत?

बस बाई बस या कार्यक्रमात एक खेळ खेळण्यात आला. गाणं ऐकून कुठल्या व्यक्तीचा चेहरा आठवतो असं त्या खेळाचं नाव होतं. पहिलं गाणं लागलं ते "कशी नशिबानं थट्टा आज मांडली?" हेच गाणं. हे गाणं ऐकून अमृता फडणवीस कार्यक्रमाचं सूत्रसंचलान करणाऱ्या सुबोध भावेंना म्हणाल्या तुमच्यासमोर कुणाचा चेहरा येतो? त्यावर सुबोध भावे म्हणाले की माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा येतो.. माझा स्वतःचाही चेहरा येतो त्यामुळे मला नीट सांगता येणार नाही. तुम्ही सांगा की कुणाचा चेहरा समोर येतो. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या हे गाणं ऐकून माझ्यासमोर उद्धवजी ठाकरेंचा चेहरा समोर येतो.

amruta fadnavis as a guest and talk about uddhav thackeray
लोक मामी म्हणतात हे ऐकून कसं वाटतं? अमृता फडणवीस म्हणतात...

नेमकं काय घडलं बस बाई बस या शोमध्ये?

गाने गाने पे लिखा है किस किस का नाम असं या खेळाचं नाव होतं. या खेळात पहिलं गाणं वाजलं ते कशी नशिबानं थट्टा आज मांडली. "माझ्या डोळ्यासमोर उद्धव ठाकरे यांचाच चेहरा आला. मी त्यांचा खूप सन्मान करते. मात्र हे गाणं ऐकल्यावर माझ्यासमोर त्यांचाच चेहरा आला." असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीस यांनी दिलेलं हे उत्तर चांगलंच चर्चेत राहिलं. काही नेटकऱ्यांनी अमृता फडणवीस यांना ट्रोलही केलं आहे. मात्र दुसरीकडे कार्यक्रमात दिलेल्या त्यांनी विविध उत्तरांचीही चर्चा आहे. मात्र महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यानंतर अमृता फडणवीस यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

याच कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे का? या प्रश्नाला उत्तर दिलं. तसंच लोक देवेंद्र फडणवीस यांना मामु आणि तुम्हाला मामी म्हणतात ते ऐकून कसं वाटतं या प्रश्नालाही उत्तर दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in