नागपूर, ठाण्याचे हरुन-अल-रशीद; संजय राऊतांची फडणवीस-शिंदेंवर टीका, अमृता फडणवीसांचे मानले आभार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार राज्यात अस्तित्वात आलंय. नवं सरकार आलं असलं, तरी शिवसेना आणि बंडखोर शिंदे गटातील संघर्ष थांबलेला नाही. शिवनेतील बंडखोरीत भाजपचाही सहभाग होता, यावरून बरंच रणकंदन सुरू झालं आहे. त्यावरूनच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना हरुन अल रशीद यांची उपमा देत लक्ष्य केलंय.

खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून देवेंद्र फडणवीस यांच्या वेषांतर करून भेटीगाठींवर भाष्य केलंय. “एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह जे बंड केले, त्याच्याशी भाजपचा संबंध नाही असे सांगणारे भाजपवाले उघडे पडले. शिंदे यांनीच पडद्यामागचे सारे कारस्थान विधानसभेत फोडले व आता अमृता फडणवीस यांनीच घरातले गुपित फोडले. ‘या सर्व काळात देवेंद्र फडणवीस हे रात्री-अपरात्री वेषांतर करून शिंदे यांना भेटण्यासाठी बाहेर पडत.’ काळा कोट, काळा चष्मा, फेल्ट हॅट असे जेम्स बॉण्ड किंवा शेरलॉक होम्स पद्धतीचे वेषांतर करून ते बाहेर पडत असावेत. त्यांच्या तोंडात चिरूट वगैरे आणि हातात नक्षीदार काठी होती काय? याचाही खुलासा व्हायला हवा,” असा मिश्किल टोला राऊतांनी लगावलाय.

एकनाथ शिंदेंच्या धावत्या भेटीत युवासेनेला धक्का, महाराष्ट्र सहसंघटक उद्या देणार राजीनामा

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत,” असं राऊत म्हणाले आहेत.

“बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी.”

“फक्त ५० खोके? कसले मिठाईचे का?” एकनाथ शिंदेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

ADVERTISEMENT

“हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार?,” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

बंडखोर आमदारांना रेड्याच्या टीकेवरून उत्तर

“गुवाहाटीस गेलेल्या आमदारांची ‘रेडा’ अशी हेटाळणी केली म्हणून ते नाराज झाले व त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडल्याची बतावणी सुरू आहे हा गैरसमज आहे. ‘टोणगा’ हा वाप्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. अत्रे-ठाकरे यांनी ते जाहीर सभांतून वापरले आहे. रेडा हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. इतर देवतांप्रमाणे मृत्युदेवता, यमदेवता आहे. त्या देवतेचे वाहन रेडा आहे.”

“शंकराच्या नंदीइतकेच रेड्यालाही हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे हे नवहिंदुत्ववादी विसरलेले दिसतात. ज्ञानेश्वरांनी ‘वेद’ म्हणवून घेण्यासाठी रेड्याचीच निवड केली. ‘यमा’स धर्मराज, सूर्यपुत्र अशा अन्य नावांनी ओळखले जाते. ‘यम’ हा ‘काळ’ म्हणून ओळखला जातो व रेड्याशिवाय त्या काळाचे महत्त्व नाही. हिंदुत्वाचा हा अध्याय आहे. शिवसेना सोडून वेगळ्या गटात गेलेल्या आमदारांनी हा हिंदुत्वाचा अध्याय समजून घेतला पाहिजे,” असं उत्तर राऊतांनी बंडखोर आमदारांना दिलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT