Bharat Gogawale : ''घरच्या बाईमुळे शिवसेना फुटली'', रश्मी ठाकरेंचं नाव न घेता गोगावलेंचे खळबळजनक दावे

अनुजा धाक्रस

ADVERTISEMENT

bharat gogawale big statement on shiv sena split shiv sena ubt udhhav thackeray rashmi thackeray eknath shinde lok sabha election 2024
घरच्या मंडळींनी राजकारणात हस्तक्षेप केला म्हणजे रामायण, महाभारत घडलं समजायचं
social share
google news

Bharat Gogawale Big Revealation on Shiv Sena Split : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून चौफेर टीका केली जात आहे. त्यात आता शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी रश्मी ठाकरेंवर टीका केली आहे. घरच्या मंडळींनी हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेना फुटल्याची टीका गोगावले (Bharat Gogawale)  यांनी नाव न घेता रश्मी ठाकरेंवर (rashmi thackeray) केली आहे. (bharat gogawale big revealation on shiv sena split shiv sena ubt udhhav thackeray rashmi thackeray eknath shinde lok sabha election 2024)   

भरत गोगावले यांनी मुंबई तकला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत गोगावले यांनी शिवसेना फुटीवर मोठा गौप्यस्फोट केला. यावेळी गोगावले म्हणाले की,घरच्या मंडळींनी राजकारणात हस्तक्षेप केला म्हणजे रामायण, महाभारत घडलं समजायचं. रामायणात कैकयीने हस्तक्षेप केला होता, त्यामुळेच इतकं मोठ रामायण घडलं होतं. जर कैकयीने त्यावेळी दशरथाला सांगितलं नसतं तर दशरथाने रामाला वनवासात पाठवलं नसतं आणि रामायणही घडलं नसतं, असा रामायणाचा दाखला देऊन गोगावलेंनी रश्मी ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.  

हे ही वाचा : शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! कोणत्या जागा गमावल्या? पहा संपूर्ण यादी

जर त्यांनी (रश्मी ठाकरे) त्यावेळी सहकार्य केलं असतं. आलेल्या गेलेल्यांचा मान ठेवला असता. जसं माँ साहेब ठेवायच्या. एखाद्या नेत्यावर जर बाळासाहेब रागावले तर माँ साहेब त्याला जवळ करायच्या. पण याउलट उद्धव ठाकरेंच्या इथे घडतंय, असं म्हणत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर टीका केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेना फुटीला तो (संजय राऊत) एकटा कारणीभूत नाही आहे. महिलेने किती हस्तक्षेप करावा, हा त्यातला मतितार्थ मी सांगितला. महिलेने की राजकारणातल्या  अ‍ॅक्टीव्ह महिलेने...ज्या पडद्याच्या मागे असतात. नवरा चुकत असेल तर महिलेने त्याला सल्ला द्यावा. मुलगा चुकत असेल तर त्याला समजून सांगावं. पण सगळा गोतावळा, नाती गोती तुम्ही भरलीत तर राजकारणाचा जय महाराष्ट्र झालाच समजा, असे देखील गोगावलेंनी सांगितले.

 मी मगाशी माँ साहेबांचं उदाहरण दिलं. कधी माँ साहेबांनी बाळासाहेबांच्या निर्णयात हस्तक्षेप केला. बाळासाहेब ओरडले तर माँ साहेब त्याला जवळ करायच्या, समजावायच्या. त्यावेळी एक तरी शिवसैनिक बाजूला झाला का? त्यामुळे समजणे वाले को इशारा काफी है!, असे देखील गोगावले यांनी म्हटले.  
 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर!

गोगावले पुढे म्हणाले की, बाळासाहेब या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले असते. पण घेतलं त्यांनी मुख्यमंत्रीपद? त्यांनी कडवट शिवसैनिक मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद दिलं.नंतर नारायण राणेंना मुख्यमंत्रीपद दिलं. कुठल्याच नातेवाईकाला त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं का, हा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंमध्ये फरक असल्याचे गोगावले यांनी यावेळी सांगितले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT