Hemant Godse : शिवसेनेने तिसऱ्यांदा दिली उमेदवारी, कोण आहेत हेमंत गोडसे?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

hemant godse candidate eknath shinde shiv sena nashik lok sabha election 2024 shiv sena ubt rajabhau vaje
आज अखेर एकनाथ शिंदे यांनी हा सस्पेन्स संपवत हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे नाव घोषीत केले.
social share
google news

Who is Hemant Godse, Nashik Lok sabha Election 2024 : नाशिकच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतील तीनही पक्ष ही जागा लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत या जागेवर उमेदवारीचा सस्पेन्स कायम होता. पण आज अखेर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हा सस्पेन्स संपवत हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचे नाव घोषीत केले. त्यामुळे आता नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवणारे हेमंत गोडसे नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात. (hemant godase candidate eknath shinde shiv sena nashik lok sabha election 2024 shiv sena ubt rajabhau vaje) 

कोण आहेत हेमंत गोडसे? 

हेमंत गोडसे यांचा जन्म 3 ऑगस्ट 1970 रोजी झाला आहे. ते संसरी (ता. नाशिक) या लहान गावातील रहिवासी आहेत.

 या गावातून 1996 मध्ये गोडसे कुटुंबियातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाऊ गोडसे हे खासदार झाले होते. राजाभाऊ यांचे राजकीय वारसदार म्हणून हेमंत गोडसे यांच्याकडे पाहिले जाते. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेमंत गोडसे हे सिव्हिल इंजीनिअर असून एक बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. 

हे ही वाचा : Bharat Gogawale : ''घरच्या बाईमुळे शिवसेना फुटली'',

गोडसे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती. 

ADVERTISEMENT

2007 ते 2012 एकलहरे (ता. नाशिक) जिल्हा परिषदेचे सदस्य होते. 

ADVERTISEMENT

2008 मध्ये ते सिनेट सदस्यपदाच्या निवडणुकीतही विजयी झाले होते. 

2009 मध्ये त्यांनी मनसेचा उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. 

2012 मध्ये ते नाशिक महापालिकेच्या विहितगाव प्रभागाच्या पोटनिडणुकीत विजयी झाले होते. 

खासदारकीची हॅट्ट्रिक करण्याची संधी 

हेमंत गोडसे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर 2014 ची लोकसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर लढली होती. या निवडणुकीत गोडसेंनी 4,94,375 मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 ची लोकसभा देखील त्यांनी लढवली होती. या निवडणुकीत 5,63. 599 मते मिळवून समीर भुजबळ यांचा पराभव केला होता. 

हे ही वाचा : शिंदेंचे लोकसभेचे 15 उमेदवार ठरले! कोणत्या जागा गमावल्या? पहा संपूर्ण यादी

उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पाडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. या बंडखोरी दरम्यान शिंदेंना 13 खासदारांनी साथ दिली होती. यामध्ये हेमंत गोडसे यांचा समावेश होता. आता महायुतीतून नाशिकच्या जागेवरून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे यंदा त्यांना विजयाची हँट्ट्रीक करण्याची संधी होती. 

दरम्यान नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरेंच्याच शिवसेनेचे विजय करंजकर हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तीन शिवसैनिक आमने-सामने येणार आहेत. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT