मुंबई : पत्नी अन् तिच्या प्रियकराला घरी बोलावून फुल्ल दारु पाजली, अन् थंड डोक्याने मोठं कांड
Mumbai Crime News : पत्नीवर असलेल्या अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने फिल्मी स्टाईलने पत्नीसमोरच तिच्या प्रियकराची हत्या करून पळ काढला, ज्याला पोलिसांनी 3 तासात अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : पत्नी अन् तिच्या प्रियकराला घरी बोलावून फुल्ल दारु पाजली
अन् थंड डोक्याने मोठं कांड, पत्नीसमोर त्याचा गळा चिरला
Mumbai Crime News : मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागातील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्यांना काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी एक भीषण घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर असलेल्या एका पतीने अत्यंत थंड डोक्याने कट रचून ही हत्या घडवून आणली. आरोपी भीमराज ओमप्रकाश शर्मा (48) याला आपल्या पत्नीचे विकास अशोक भुसारे याच्याशी प्रेमसंबंध असल्याचा दीर्घकाळापासून संशय होता. यापूर्वी विकासने पत्नीची छेड काढल्याची तक्रारही भीमराजने केली होती, मात्र त्यानंतरही विकास सतत त्याच्या पत्नीच्या संपर्कात राहिल्याने भीमराजच्या मनात संतापाची लाट होती. याच रागातून भीमराजने विकासला आपल्या घरी बोलावले आणि पत्नीच्या समोरच रक्तरंजित खेळ खेळला.
हेही वाचा : सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल
या घटनेतील आरोपीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने विकासला आपल्या जाळ्यात ओढले. भीमराजने विकासला घरी बोलावून पत्नीसह मिळून मद्यपानाची पार्टी आयोजित केली होती. रात्री उशिरापर्यंत हे तिघेही सोबत बसून दारू पीत होते. जेव्हा सर्वजण नशेमध्ये धुंद झाले, तेव्हा भीमराजने विकासला समजावण्याच्या सुरात 'माझ्या घरी वारंवार का येतोस, आता पुन्हा येऊ नकोस' असे बजावले. मात्र, काही क्षणातच भीमराजचा संयम सुटला आणि त्याने घरात असलेला चाकू उचलून आपल्या पत्नीच्या डोळ्यादेखत विकासचा गळा चिरण्यास सुरुवात केली. विकासचा जागीच मृत्यू होईपर्यंत आरोपी त्याच्यावर वार करत राहिला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
हेही वाचा : पायाचा अंगठा निळा पडला, अखिलेश यादवांच्या भावाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे!









