पायाचा अंगठा निळा पडला, अखिलेश यादवांच्या भावाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे!
Prateek Yadav postmortem Report : प्रतीक यादव यांच्या पोस्टमार्टम अहवालातून मृत्यूचे धक्कादायक कारण समोर आले असून फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पायाचा अंगठा निळा पडला, अखिलेश यादवांच्या भावाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे!
प्रतीक यादवांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
Prateek Yadav postmortem Report : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचे बुधवारी वयाच्या 38 व्या वर्षी अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, मृत्यूचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. अहवालानुसार, मृत्यूचे मुख्य कारण 'पल्मोनरी थ्रोम्बोम्बोलिज्म' असल्याचे सांगण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांच्या फुफ्फुसाच्या नसांमध्ये रक्ताची एक मोठी गुठळी जमली होती, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाने अचानक काम करणे बंद केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांच्या शरीरावर काही जखमांच्या खुणाही आढळल्या आहेत, परंतु त्या जुन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, आजारपणामुळे त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याचे नख निळे पडले होते.
हेही वाचा : सूनेला तोकड्या कपड्यात रील बनवण्याचं वेड, सासू-सासऱ्यांचं भयंकर पाऊल
वैद्यकीय तपासणी आणि Viscera रिपोर्टची प्रतीक्षा
मृत्यूचे नेमके आणि अंतिम कारण स्पष्ट करण्यासाठी डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरी बाळगली आहे. तपासणी अधिक अचूक व्हावी यासाठी Viscera आणि हृदयाचे काही भाग रासायनिक तसेच हिस्टोपॅथोलॉजिकल चाचणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. Viscera रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे, जेणेकरून शरीरात कोणतेही विष किंवा इतर रसायने होती का, याची पुष्टी होऊ शकेल. आता सर्वांचे लक्ष Viscera अहवालाकडे लागले आहे, ज्यानंतरच मृत्यूच्या कारणावरील शिक्कामोर्तब होईल. सिव्हिल हॉस्पिटलचे संचालक डॉ. जी.सी. गुप्ता यांनी सांगितले की, सकाळी 5:30 च्या सुमारास ड्रायव्हरने रुग्णालयात येऊन मदतीची मागणी केली होती, मात्र वैद्यकीय पथक घरी पोहोचले तेव्हा प्रतीक यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला कुटुंबीय मृतदेह घरी नेऊ इच्छित होते, परंतु नंतर पोस्टमार्टेमसाठी सहमती दर्शवण्यात आली.
हेही वाचा : पुणे : ब्युटीशियनला प्रियकराने गाडीतच संपवलं, गोरखनाथने आफरीनचा काटा काढला









