डिझाइनमधील एका चुकीमुळे मुंबई मेट्रोला 250 कोटींचा फटका?
mumbai metro line 7a design error : मुंबई मेट्रो लाईन 7A च्या डिझाइनमधील चुकीमुळे सुमारे 250 ते 260 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. AAI कडून उंचीमध्ये सूट न मिळाल्यास सुमारे 1 किलोमीटरचा एलिव्हेटेड वायाडक्ट तोडून पुन्हा बांधावा लागू शकतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डिझाइनमधील एका चुकीमुळे मुंबई मेट्रोला 250 कोटींचा फटका?
सुमारे 1 किलोमीटरचा एलिव्हेटेड वायाडक्ट तोडून पुन्हा बांधावा लागू शकतो
mumbai metro line 7a design error : मुंबई मेट्रो लाईन 7A च्या बांधकामातील डिझाइनची एक चूक आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA साठी मोठा आर्थिक झटका ठरू शकते. या चुकीमुळे सुमारे 250 ते 260 कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण विले पार्ले पूर्व येथील एअरपोर्ट कॉलनी स्टेशनजवळील एलिव्हेटेड वायाडक्ट आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन (OHE) सिस्टीमच्या उंचीशी संबंधित आहे. हा संपूर्ण भाग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या महत्त्वाच्या एअर फनल झोनमध्ये येतो.
हेही वाचा : जिथं चहा घेतला तेच हॉटेल झटक्यात गेलं वाहून, प्रदीप तेंडुलकरांची कहाणी ऐकून तुम्हीही जाल हादरून!
पायाभूत सुविधा सुरक्षा मर्यादेपेक्षा सुमारे 2.5 मीटर जास्त उंच
MMRDAच्या म्हणण्यानुसार, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने या प्रकल्पासाठी NOC दिली होती. मात्र, प्रकल्पाचे जनरल कन्सल्टंट आणि डिझाइन कन्सोर्टियम SYSTRA-CEG-SMCIPL यांनी OHE सिस्टीमच्या अतिरिक्त उंचीचा डिझाइन आणि प्लॅनिंग करताना पुरेसा विचार केला नाही. या चुकीमुळे तयार करण्यात आलेली पायाभूत सुविधा विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या सुरक्षा मर्यादेपेक्षा सुमारे 2.5 मीटर जास्त उंच झाली आहे.
हेही वाचा : स्लीपर कोचमध्ये 16 वर्षीय मुलीवर कंडक्टर आणि ड्रायव्हरकडून अत्याचार
