स्लीपर कोचमध्ये 16 वर्षीय मुलीवर कंडक्टर आणि ड्रायव्हरकडून अत्याचार

मुंबई तक

Crime News : एका स्लीपर कोचमध्ये 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत बस चालक आणि कंडक्टरला अटक केली.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बसमध्ये 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

point

आरोपी बसचालक आणि कंडक्टरची ओळख समोर 

Crime News : दिल्लीच्या काश्मीरी गेट परिसरात मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एका स्लीपर कोचमध्ये 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. संबंधित प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई करत बस चालक आणि कंडक्टरला अटक केली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेल्याचे वृत्त आहे.  

हे ही वाचा : Astrology : श्रावणी सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी, 'या' राशींवर राहणार आशीर्वाद

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी रात्री घडले होते. आरोपीची बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप अशी ओळख समोर आली, नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. पीडिता ही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे, ती इयत्ता 11 वीत शिकत होती. 

पोलिसांच्या सूत्रानुसार, विद्यार्थिनी नाराज होऊन घरातून निघून गेली होती. नंतर तिने नोएडा येथील राहणाऱ्या तिच्या चुलत भावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र मध्येच पाऊस आला आणि तिने उशिरा रात्रीची वेळ पाहता, ती एका चौकात उतरली होती. यादरम्यान एक प्रवासी नसलेली स्लीपर कोच बस घटनास्थळावरून गेली होती.  

बस चालक आणि कंडक्टरचा मिळून पीडितेवर अत्याचार 

इतक्यात पीडितेनं बस थांबण्यासाठी इशारा केला असता. वाहनचालक-कंडक्टरने तिला नोएडा येथील सेक्टर 63 येथे सोडवतो असे सांगत तिला बसमध्ये बसवले होते. नंतर बसने काही अंतर कापल्यानंतर बस चालक आणि कंडक्टरने मिळून पीडितेवर अत्याचार केला, त्या दरम्यान पीडितेनं अनेकदा विरोध केला असता, तिला मारहाणीची धमकी देण्यात आली होती.