मुंबई : फोनमध्ये व्यस्त, वेगाने कार चालवली, रस्ता ओलांडणाऱ्या 8 वर्षीय मुलाला चिरडलं
Mumbai hit and run case : मुंबईच्या वांद्रे पश्चिममध्ये रस्ता ओलांडणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला इनोव्हा क्रिस्टाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. फोनवर बोलताना आणि वेगाने कार चालवल्याच्या आरोपावरून चालक मेघा रावल यांना पोलिसांनी अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : फोनमध्ये व्यस्त, वेगाने कार चालवली
रस्ता ओलांडणाऱ्या 8 वर्षीय मुलाला चिरडलं
Mumbai hit and run case : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. जॉन बॅप्टिस्ट रोड ओलांडत असताना या मुलाला इनोव्हा क्रिस्टाने धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या 45 वर्षीय मेघा रावल यांना अटक केली आहे. अपघाताच्या वेळी त्या फोनवर बोलत असल्याचा आणि कार वेगाने चालवत असल्याचा आरोप असून, पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.
हेही वाचा : Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!
रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे 2.15 वाजता मेघा रावल या जॉन बॅप्टिस्ट रोडवरून इनोव्हा क्रिस्टा चालवत होत्या. त्या पोषणतज्ज्ञ आहेत. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ वर्षांच्या मुलाला त्यांच्या कारने धडक दिली. अपघाताच्या वेळी रावल फोनवरील संभाषणामुळे विचलित झाल्या होत्या आणि कारचा वेगही जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पाऊस मंदावला, पण 'या' विभागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
