Maharashtra Weather : राज्यात पाऊस मंदावला, पण 'या' विभागातील जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात पावसाचे कमी अधिक प्रमाण जाणवू लागले आहे. अशातच जाणून घ्या 31 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज.

ADVERTISEMENT

maharashtra weather rainfall (AI Photo)
maharashtra weather rainfall (AI Photo)
Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पाऊस मंदावला

point

31 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज घ्या जाणून

Maharashtra Weather : राज्यात पावसाचे कमी अधिक प्रमाण जाणवू लागले आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम, तसेच काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर काही भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे, अशातच जाणून घ्या 31 ऑगस्ट 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. 

हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! नवऱ्यासह मित्राचा महिलेवर अत्याचार, स्मशानभूमीतील भयंकर घटना

कोकण 

कोकणात पालघर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. ठाणे आणि मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची अधिकची शक्यता आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.