Personal Finance: तुमच्या नावावर कुठे-कुठे आहे पैसा? एका दिवसात 'असा' शोधा सगळा पैसा!
तुमच्या नावावर जुने Bank Deposits, Mutual Funds, Shares, Insurance किंवा PFचे पैसे अडकले आहेत का? RBI UDGAM, SEBI MITRA, IEPF, EPFO आणि IRDAIच्या माध्यमातून एका दिवसात तुमची Financial Inventory कशी तपासायची ते जाणून घ्या.
ADVERTISEMENT

कधी आपण जुने बँक खाते बंद करायचं विसरतो, एखादी जुनी Mutual Fund गुंतवणूक लक्षात राहत नाही, नोकरी बदलल्यानंतर PFचा मागोवा राहत नाही किंवा वर्षानुवर्षे एखाद्या Insurance Policyचा विसर पडतो. विशेष म्हणजे, तुमच्या नावावर असलेली प्रत्येक आर्थिक गुंतवणूक एका ठिकाणी दिसेलच असं नाही. त्यामुळे वर्षातून किमान एकदा स्वतःच्या नावावर असलेल्या आर्थिक मालमत्तेचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे.
यासाठी वेगवेगळ्या सरकारी आणि अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर करून एका दिवसात तुमची ‘Financial Inventory’ तयार करता येऊ शकते.
1. सर्वप्रथम बँक खात्यांमध्ये पैसे आहेत का ते तपासा
यासाठी RBIचं UDGAM (Unclaimed Deposits – Gateway to Access Information) पोर्टल महत्त्वाचं आहे. या प्लॅटफॉर्मवर सहभागी बँकांमधील Unclaimed Deposits/Accounts शोधता येतात. व्यक्तीच्या बाबतीत नाव, बँक आणि PAN, Driving Licence, Voter ID, Passport किंवा Date of Birth यापैकी आवश्यक माहिती वापरून शोध घेता येतो.
UDGAMवर सगळ्या बँकांचे खाते किंवा प्रत्येक प्रकारची Deposit दिसेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या जुन्या Bank Statements, Email आणि SMSमध्येही शोध घ्या.
