मुंबईची खबर: तरुण थेट कामाठीपुराच्या हॉटेलमध्ये घुसला, पण नशीब खराब.. 'ते' सत्य आलं जगासमोर!
मुंबई गुन्हे शाखेने एका बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकाला अटक केली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित आरोपी मुंबईत बनावट नावाने राहत होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई पोलिसांकडून बांग्लादेशी घुसखोऱ्याला अटक
भारतात घुसून कमाठीपुराच्या हॉटेलमध्ये करु लागला काम..
Mumbai News: मुंबई गुन्हे शाखेने एका बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकाला अटक केली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित आरोपी मुंबईत बनावट नावाने राहत होता. मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने ही अटक केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या देशात चार खून प्रकरणांमध्ये संघटिक गुन्हेगार होता आणि त्यापैकी एका प्रकरणात त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
बांग्लादेशी जमाल हुसैन आहे तरी कोण?
प्रकरणातील आरोपीचं नाव मोहम्मद जमाल हुसैन पोटुंदर उर्फ कुद्दुस रहीम शेख असं असून तो 2023 मध्ये पश्चिम बंगालमधून बेकायदेशीरपणे भारतात आला होता. येथे त्याने बनावट आधार कार्ड बनवून घेतले. त्यानंतर संबंधित आरोपी मुंबईत आला आणि कामाठीपुरा येथील एका हॉटेलमध्ये काम करू लागला. आरोपीला बांग्लादेशातील एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं असून त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. बांगलादेश उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर तो भारतात पळून गेला आणि बनावट म्हणजेच खोटी ओळख सांगून राहू लागला.
मुंबई पोलिसांच्या तपासात काय हाती लागलं?
मुंबई गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या सामानाची झडती घेतली असता त्यांना तो तरुण चार खुनांमध्ये सहभागी असल्याची बंगाली भाषेतील चार कागदपत्रे सापडली. बांग्लादेश पोलिसांनी अटक वॉरंट जारी केल्यानंतर आणि त्याचा शोध सुरू झाला आणि त्याच्या मूळ गावातील कोणीतरी त्याला ही कागदपत्रे पाठवली असल्याचं समोर आलं.
हे ही वाचा: इन्स्टाग्रामवर तरुणासोबत जडलं प्रेम! प्रेग्नंट झाल्यावर BF ने केलं भयंकर कृत्य..सोशल मीडियानं तिचं वाटोळं केलं, घडलं तरी काय?
13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
वॉरंट जारी झाल्यानंतर आरोपी बांग्लादेशातून पळून गेला. तेव्हा तो पश्चिम बंगालमध्ये घुसला आणि त्यानंतर मुंबईत आला. एका गुप्त माहितीच्या आधारे, मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययूने आरोपी तरुणाला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे न्यायालयाने त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.










