इन्स्टाग्रामवर तरुणासोबत जडलं प्रेम! प्रेग्नंट झाल्यावर BF ने केलं भयंकर कृत्य..सोशल मीडियानं तिचं वाटोळं केलं, घडलं तरी काय?
Married Woman Viral Love Story : राजस्थानच्या अजमेरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत सर्वात भयंकर घटना घडली. या महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरु केलं.

बातम्या हायलाइट

सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलं सर्वात मोठं कांड!

दोघांनी लग्न करायचं ठरवलं अन् असं काही घडलं..

सोशल मीडियामुळे महिलेचं वाटोळं झालं
Married Woman Viral Love Story : राजस्थानच्या अजमेरमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत सर्वात भयंकर घटना घडली. या महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरु केलं. त्यानंतरी ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. याचदरम्यान, ती प्रेग्नंटसुद्धा झाली. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, आरोपी तरुणाने तिची फसवणूक केली. जेव्हा ती प्रेग्नंट झाली, तेव्हा तिला गोळ्या देऊन गर्भपात करायला लावलं. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून घडलं सर्वात मोठं कांड!
याबाबत सविस्तर वृत्त असं की, महिला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर खूप सक्रीय होती. दिवसरात्र ऑनलाईन राहायची. याचदरम्यान इन्स्टाग्रामवर तिची ओळख एका अज्ञात व्यक्तीसोबत झाली. महिलेनं त्या व्यक्तींच्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स करणं सुरु केलं. तरुणाने तिच्या सौंदर्याचं कौतुक करत तिचं मन जिंकलं. त्यानंतर त्यांची जवळीक वाढली अन् दोघांनीही एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले.
हे ही वाचा >> "तुला स्वयंपाक येत नाही चल घरून 20 लाख घेऊन ये..." पुण्यात हुंड्यासाठी छळ अन् अखेर पीडितेनं...
दोघांनी लग्न करायचं ठरवलं अन् असं काही घडलं..
फोनवर दोघांचीही मैत्री वाढली, अनेकदा दोघांच्यात इतकं बोलणं व्हायचं की, सकाळ झाल्याचंही त्यांना कळत नव्हतं. दोघांच्या मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर महिलेनं मोठ मोठे स्वप्न पाहायला सुरुवात केली. विवाहित महिला त्या तरुणाला भेटायला जाऊ लागली. त्यानंतर त्यांचे संबंध आणखी घट्ट झाले आणि त्यांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्यानंतर महिलेला आनंद झाला.
पण काही दिवसानंतर प्रेमप्रकरणात मोठा ट्वीस्ट आला. तरुणाने महिलेला धोका दिला. तरुणाने महिलेशी खोटं बोलून तिची फसवणूक केल्याचं समोर आलं. त्यानंतर महिलेचं टेन्शन खूप वाढलं. महिलेचं म्हणणं आहे की, तिचं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं आहे. याप्रकरणी अजमेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. पोलीस याप्रकणातील सत्य समोर आणण्यासाठी तपास करत आहेत.