सेक्स रॅकेट समोर आलं अन् मिरा-रोड हादरलं, WhatsApp वर मुलींचे फोटो पाठवायची 'माही' आणि नंतर...
मुंबईतील मीरा रोडमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुलींना देह व्यापाऱ्यात अडकवणाऱ्या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईतील मीरा रोडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पोलिसांकडून आरोपी महिलेला अटक
Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोडमध्ये पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. प्रकरणातील आरोपी ‘माही’ नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. ही महिला मुलींना देह व्यापाऱ्यात अडकवण्याचं काम करत होती. आरोपी महिला फोनवरून ग्राहकांशी संपर्क साधत होती. ती ग्राहकांना व्हॉट्सअॅपवर मुलींचे फोटोज पाठवत होती. त्यानंतर ती ग्राहकांकडून पैसे घेऊन वेश्याव्यवसायासाठी मुलींचे शोषण करत असे. पोलिसांनी या व्यवसायातील दोन पीडित मुलींचीही सुटका केली आहे. मीरा-भाईंदर पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट (AHTU) ने प्रकरणातील आरोपींवर ही कारवाई केली.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदरमध्ये एका महिलेने इतर मुलींना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं होतं. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. माहिती मिळताच अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि खोट्या ग्राहकांच्या मदतीने सापळा रचला.
आरोपी महिला म्हणजे माहीने दिलेल्या माहितीनुसार, मुलींना बालाजी हॉटेल ग्रीन अव्हेन्यू बिल्डिंग, ओम शांती चौक, मीरा रोड पूर्व येथे नेऊन ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात येत होते.









