मादक अदा, सगळेच फिदा.. कान्समध्ये धुरळा उडवणारी नेहा आहे तरी कोण?
अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड फॅशन सेन्स आणि कान्समधील आकर्षक पदार्पणामुळे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. पाहा तिचे कान्समधील खास फोटो.
ADVERTISEMENT

1/7
नेहा मलिक ही एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. मुळात ती भोजपुरी अभिनेत्री आहे. पण तरीही सोशल मीडियामुळे तिचे प्रचंड फॉलोवर्स आहेत.

2/7
नेहा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून ओळखली जाते.

3/7
2025 च्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या हॉट लूकमुळे ती सध्या खूपच चर्चेत आहे.

4/7
नेहाने रेड कार्पेटवर रेड बीडेड डीपनेक गाउन, ट्रान्सपेरंट ग्लव्हज आणि नेकलेस परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं.

5/7
नेहा मलिकने 2016 मध्ये भोजपुरी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण वेगवेगळ्या आयटम नंबरमधून तिने अधिक लोकप्रियता मिळवली.

6/7
तिने पंजाबी म्युझिक व्हिडिओ आणि काही टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. तिची स्टाइल आणि बोल्ड फोटोशूट यामुळे ती अधिक चर्चेत असते.

7/7
नेहा इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय आहे आणि तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यंदा तिने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये पदार्पण केले आणि तिच्या तेथील फोटोंमुळे ती अधिकच चर्चेत आली आहे.